वर्धा (Minor Girl molestion) : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश – ३ तथा अति. सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला.
न्यायालयाने आरोपी गजानन (वय ५६ वर्ष) यास कलम ४५२ भादंवी कायद्याअतंर्गत ३ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व ५,००० रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त ६ महिन्याच्या साधा कारावसाची शिक्षा, कलम ४ व ६ बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (Minor Girl molestion) आरोपी मरेपर्यंत जन्मठेपेच्या कारावासाची शिक्षा व दंड ४०,००० रुपये, दंड न भरल्यास ०२ वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा तसेच कलम ५०६ भादवी कायदाअतंर्गत २ वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा व दंड ५,००० रुपये, दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिण्याच्या साधा कारावसाची शिक्षा ठोठावण्यात आली.
तसेच पीडितेला नुकसान भरपाई म्हणुन दंडाच्या रक्कमेतून १५,००० रुपये देण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे फौ.प्र.सं चे कलम ३५७ (अ) प्रमाणे भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले. (Minor Girl molestion) आरोपीने पीडितेसोबत जबरदस्तीने अत्याचार केला.तिला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने घटना कोणाला सांगितली नाही. पीडिताची प्रकृती ठिक नसल्याने दवाखान्यात गेली असता ४ महिन्याची गर्भवती असल्याचे समजले. याबाबत सेलू पोलिस ठाण्यात येऊन तक्रार केली.
प्रकरणाचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक अनुराधा फुकट यांनी केला. तपासा दरम्यान (Minor Girl molestion) आरोपीने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना सदर प्रकरणात अ?ॅड. स्वाती एन. गेडे (दोडके) यांनी कामकाजात मदत केली. पैरवी सहा. फौजदार संजय चावके यांनी साक्षदाराना हजर करून कामगीरी बजावली. शासनातर्फे १६ साक्षदार तपासले.