शाळेत जातांना घडली घटना, पाथरी पोलीसात गुन्हा
परभणी (School girl molested Case) : शाळेत पायी एकटी जात असलेल्या अल्पवयीन मुलीला तुझ्या दप्तरात सिताफळ टाकून देतो, असे म्हणत एका शेतात नेऊन तिचा विनयभंग करण्यात आला. ही घटना पाथरी तालुक्यातील बाबुलतार येथे घडली. (School girl molested Case) पिडितेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपीवर पाथरी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी गजानन साखरे याने सदर मुलीला तुझ्या दप्तरात सिताफळे टाकून देतो, असे म्हणत शेतात नेले. या ठिकाणी वाईट उद्देशाने पकडून तिचा विनयभंग केला. पिडितेने मी घरी सांगेन असे म्हणाल्यावर आरोपीने तिला शाळेत जाऊ देणर नाही, इकडेच मारुन टाकतो, अशी धमकी दिली. ही घटना १ ऑक्टोबरच्या सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. तपास (Pathari Police) सपोनि. घायवट करत आहेत.
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाचे उल्लंघन; गुन्हा नोेंद
परभणी : जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करत सार्वजनिक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केल्या प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मंगळवार १ ऑक्टोबर रोजी दुपारी अडिच वाजेच्या सुमारास अचानक महापालिका कार्यालया समोरील प्रमुख रस्त्यावर आरक्षण मागणी करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकार्यांचे जमावबंदी आदेश लागु असतानाही आंदोलन केल्या प्रकरणी पोशि. मोहित खान पठाण यांच्या फिर्यादीवरुन १२ आंदोलनकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद झाली आहे. तपास पोह. मुंढे करत आहेत.