परभणी/गंगाखेड(Parbhani):- इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात धरून तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करून विनयभंग (molestation) केल्याची घटना शहरात घडली आहे. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
याबाबत सविस्तर माहिती अशी इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणारी अल्पवयीन मुलगी गुरुवार १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास घराबाहेर फिरत असतांना अजय सूर्यकांत सावंत नामक तरुणाने तु मला खूप आवडतेस असे म्हणून एका बांधकामाच्या ठिकाणी नेऊन तिचा हात धरून तोंड दाबत ती नकार देत असतांनासुद्धा तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची घटना घडली. या घटनेची माहिती मुलीने घरी दिल्याने अल्पवयीन मुलीच्या पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवार रोजी रात्री उशिराने गंगाखेड पोलीस ठाण्यात (Police station)गुन्हा दाखल करण्यात आला. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपककुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.