मुंबई (Mirzapur) : मिर्झापूर या लोकप्रिय वेब सीरिजच्या नव्या सीझनची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. निर्मात्यांनी नुकतीच रिलीज डेट जाहीर केली होती. एक टीझर शेअर करण्यात आला होता, जो पाहिल्यानंतर यावेळी धमाका होणार आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आता या मालिकेत गजगामिनी म्हणजेच गोलू गुप्ताची भूमिका साकारणारी अभिनेत्री श्वेता त्रिपाठी (Shweta Tripathi) हिने ट्रेलर रिलीजबद्दल माहिती दिली आहे. श्वेता त्रिपाठीने (Mirzapur) मिर्झापूर सीझन 3 चे नवीन पोस्टर शेअर केले असून, ट्रेलर 20 जूनला येणार असल्याचे सांगितले आहे.
पोस्टर शेअर करताना श्वेता त्रिपाठीने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आम्ही मार्ग सेट केला आहे. (Mirzapur) पोस्टरमध्ये गुड्डू भैया, कालिन भैया, गोलूसह अनेक महत्त्वाच्या व्यक्तिरेखा दिसत आहेत. बीनाची भूमिका करणारी रसिका मांग, गडद सिंदूर आणि तिच्या चेहऱ्यावर धूर्त भाव. विजय वर्माचे वाढलेले केस आणि लूक यावेळेस त्याची भूमिका प्रेक्षकांना खूश करणार असल्याचे सूचित करते. कालिन भैय्याची विधवा सून माधुरी भाभीच्या व्यक्तिरेखेकडून अपेक्षा आहेत.
यावेळी जंगलाचा सिंह बनण्याच्या लढाईमध्ये कुटुंब, प्रेम, मैत्री आणि बंधुभावही पाहायला मिळणार आहे. (Mirzapur) गुड्डू भैय्याची बहीण डिम्पी आणि रॉबिन यांच्यातील प्रेमकहाणी सुरू होणार आहे. अलीकडेच डिम्पीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षिता गौर म्हणाली होती की, डिम्पी आणि रॉबिनची प्रेमकथा मला घाणेरड्या चिखलात फुललेल्या एका सुंदर कमळाची आठवण करून देते.