ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता केले परस्पर व्यवहार
– संदीप बलवीर
तालुका प्रतिनिधी
नागपूर (Gram Panchayat Panjri) : नागपूर पंचायत समिती अंतर्गत नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील (Gram Panchayat Panjri) ग्रामपंचायत पांजरी (बु ) येथील सरपंचा किरण सचिन नगराळे व सचिव रवींद्र टेकाडे यांनी ग्रामपंचायत सदस्यांची,मासिक सभेची मंजुरी नसतांना सरपंच व सचिवांनी संगणमत करून मर्जीतल्या एजन्सीला निविदा देत जनतेच्या कराच्या (टॅक्स) करोडो रुपयाचा भ्रष्टाचार/गैरव्यवहार केल्याचा आरोप येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश बाराहते, जगदीश कुंभरे, सुषमा आमले, कविता कोराम, अलका यादव, सोनाली कोराम, भावना मेश्राम व महेश भोयर यांनी केला असून जनतेच्या पैश्याचा दुरुपयोग करणाऱ्या सरपंच व सचिवावर तात्काळ कार्यवाही करून जनतेच्या कराची गबन केलेली रक्कम वसूल करण्याची मागणी केली आहे.
सरपंच व सचिव यांचे संगणमताणे मार्जितल्या एजन्सीला दिली निविदा
सविस्तर वृत्त असे की, (Gram Panchayat Panjri) ग्रामपंचायत पांजरी (बु ) यांनी सण २०२४-२५ या वित्तीय वर्षात बांधकाम व पानिपरवठा साहित्याची मासिक सभेत उघडण्यात आलेली ई -निविधा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचार संहितेचे पालन न केल्याचे कारण दर्शवून सदर ई -निविदा रद्द करून नव्याने ई – निविदा बोलवण्या बाबत बहुमताने ठराव मंजूर झालेला असतांना सरपंच किरण नगराळे व सचिव रवींद्र टेकाडे यांनी एल वन (संजय एस. पांडे ) हा निविदाधारक बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्यास असमर्थ असल्यामुळे ती रद्द करणेबाबतचा निर्णय घेऊन एल टू (प्रिया कन्सट्रक्शण ) हे एल वन निविदा धारकांचे दराने बांधकाम साहित्याचा पुरवठा करण्यास तयार असल्याचे कारण दाखवीत प्रिया कन्स्ट कडून बांधकाम साहित्याची खरेदी करण्यात आली.
सरपंच व सचिवावर कार्यवाही करून गबन केलेली रक्कम वसुल करण्याची मागणी
परंतु खरेदी केलेल्या साहित्याच्या देयकाची नोंद कॅशबुक ला न घेता प्रामाणित प्रमाणकाशिवाय देयके अदा करून ३४,२९,४८१ रुपयाचा नियम बाह्य खर्च करून गैरव्याहार केला तर पाणी पुरवठा योजनेच्या साहित्याची खरेदी केलेल्या देयकाची नोंद सुद्धा कॅशबुक ला न घेता परस्पर देण्यात येऊन २०,५८,२३४ रुपयाचा नियमबाह्य खर्च करून गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट दिसून येते. तसेच सण २०२४-२५ या वित्तीय वर्षात एक एप्रिल ते आजपावेतो (Gram Panchayat Panjri) ग्रामपंचायत पांजरी (बु.) यांनी विविध किरकोळ कामाच्या देयकाची नोंद कॅशबुकला न घेता एकूण ६४,८०,२३९ रुपयांचा नियमबाह्य खर्च सामान्य फंडातून रक्कम काढून केला आहे.
विशेष बाब अशी की, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५९ (अंदाज पत्रक आणि हिशोब ) नियम ५ नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ नियम २४ (२) (क ) अन्वये (Gram Panchayat Panjri) ग्रामपंचायतिने ५०० रुपयावरील कोणतीही जास्त रक्कम धनादेशा द्वारे देय करणे अनिवार्य असतांना सचिवानी दि. २३ जुलै २०२४ नंतर २७,८४,४०६ रुपये रोखीने खर्च केल्याचे बँक पासबुकच्या नोंदीवरून स्पष्ट झाले आहे.तरी संबंधित भ्रष्टाचारात सरपंच किरण नगराळे व सचिव रवींद्र टेकाडे लिप्त असून सरपंच व सचिवावर तात्काळ कार्यवाही करून जनतेकडून कराच्या रूपात घेतलेल्या करोडो रुपयाचा गैर व्यवहार करून गबन केलेली रक्कम वसुल करावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे.