उदगीर (Udgir Death) : उदगीर तालुक्यातील मल्लापूर येथील बाबू मल्हारी वाघमारे वय ७५ वर्ष हे २० ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाले होते त्यांचा इतरत्र नातेवाइकाकडे शोध घेतला असता तो कोठेच मिळून आला नाही,२७ ऑगस्ट रोज मंगळवारी मल्लापूर येथील डोंगरावरील वनविभागाच्या जंगलात एका (Udgir Death) व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती मल्लापूर येथे देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी व ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली असता बाबू मल्हारी वाघमारे यांचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले,घटनेचा पंचनामा करून मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याने जाग्यावरच डॉक्टर रमण येणालडे यांनी मृतदेहाचा शवविच्छेदन करून जाग्यावरच (Udgir Death) मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी बिट जमादार शिरसे,वनविभागाचे अधिकारी केसाळे उपस्थित होते.
