निरगुडा येथील १००० वर्षा पूर्वीची शिव आणि हनुमानाची देवळे सापडली
यवतमाळ (Missing Village) : सातवाहन आणि वाकाटक ह्या २००० वर्षापूर्वीच्या काळात आजच्या वनी शहराचे प्राचीन मुळ गाव हे निरगुडा नावाचे गाव होते. ह्याच गावावरून नदीला निर्गुडा हे नाव पडले,परंतु पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन वनी झाले होते परंतु हे गाव कुठे होते हे सापडत नव्हते. २०२५ मध्ये वाणीचा इतिहास लिहिण्यासाठी प्रा.सुरेश चोपणे ह्यांनी तालुक्याचे संशोधन कार्य हाती घेतल्यानंतर निरगुडा हे (Missing Village) गाव वानिजवळच दक्षिणेला आढळले. अशी माहिती संशोधक प्रा सुरेश चोपणे ह्यांनी दिली.
प्रा.सुरेश चोपणे हे त्यांच्या वणीच्या इतिहासा वरील पुस्तकासाठी मागील वर्षापासून परिसरात सर्वेक्षण आणि संशोधन करीत होते.अलीकडे मे महीन्यात त्यांना वणीच्या दक्षिणेला नदीच्या किनारी निर्गुडा हे गाव सापडले. नीर म्हणजे पाणी आणि गुडा म्हणजे गाव. ह्याच (Missing Village) नीरगुडा गावावरून नदीला निर्गुडा हे नाव पडले.हे गाव खूप प्राचीन असल्याने इथे सध्या लेखी पुरावे आढळले नाही तसेच आज इथे खळबळा मोहोल्ला (रंगनाथ नगर) वस्ती झाल्यामुळे येथील सर्व पुरावे नष्ट झाले असून केवळ प्राचीन मंदिरे तेवढी शिल्लक राहिली आहे.
येथे आजही आदिवासींचे देव,भिवसन, मातामाय, अशी ४ देवळे आढळली असून १००० वर्षा पूर्वीची शिव आणि हनुमानाची देवळे येथे आढळली. निरगुडा नदीच्या पलीकडे पूर्वतीरावर सुद्धा आधीवासिंची २ मंदिरे आणि एक शिव मंदिर आढळले आहे. ह्याचाच अर्थ नदीच्या दोन्ही तीरावर निरगुडा (Missing Village) हे गाव वसले होते. लालगुडा ह्या गावात सुद्धा भिवसन आणि मातेचे मंदिर तसेच शिव आणि गणेशाची मंदिरे आढळली.
ह्यावरून लालगुडा आणि निरगुडा (Missing Village ही दोन्ही गावे प्राचीन काळात आदिवासींची गावे होती. ह्या ठिकाणी प्रा सुरेश चोपणे ह्यांना आदिवासींच्या देवता आढळल्या. पुढे ह्याच गावात हिंदू लोक राहायला आली आणि त्यांनी मंदिरे बांधली.हीच वस्ती पुढे वाकाटक आणि यादव राज्यांच्या काळात वाढली आणि ती रंगनाथ स्वामी मंदिरा पर्यंत वाढली. आज जिथे वनी आहे तिथे पूर्वी खुरटे जंगल होते .ब्रिटीशांनी वणीची आखणी करून शहर वसविले. प्राचीन वणीची वाढ दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढली.