अर्जुनी/मोरगाव(Gondia):- अर्जुनी/मोरगाव विधानसभा सार्वत्रिक निवडणुका (Elections) यशस्वीपणे पार पाडण्याकरिता प्रशासन कामाला लागले असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे आणि योग्यरीत्या पार पाडावी याकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याकरिता सामान्य निरीक्षक यांची नेमणूक केली जाते.
निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याकरिता सामान्य निरीक्षक यांची नेमणूक
अर्जुनी मोरगाव विधानसभेचे कामकाज योग्यरीत्या पार पडावे कोणत्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही व नियमाचा भंग होणार नाही यासाठी मिझोरम येथील रामदिनलियानी यांची सामान्य निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे रामदिनलियानी या 2014 बैचच्या आयएएस अधिकारी असुन सध्या त्या मिझोरम राज्य शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण उत्पादन विभागाच्या विशेष सचिव आहेत. अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात निवडणूक कामाला सुरुवात झाल्यापासून तर 23 नोव्हेंबर 2024 पर्यंत सर्व कामांवर त्यांचे लक्ष राहणार आहे. या दरम्यान विविध पथके अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण मतदान जनजागृती कार्यक्रम मतदान केंद्र अधिक ठिकाणी त्या वेळोवेळी भेट देऊन संपूर्ण प्रक्रिया योग्यरीत्या चालत असल्याची खात्री करणार आहेत. त्यांच्या संपर्क अधिकारी म्हणून श्रीमती.प्रमिला जाखळेकर या आहेत. जनसंपर्क करिता भ्रमणध्वनी क्रमांक 8468860643 आहे तर दूरध्वनी क्रमांक 07196299009 हा सुरू करण्यात आल्याची माहिती अर्जुनी/मोरगाव चे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वरूणकुमार सहारे यांनी दिली आहे. सामान्य निरीक्षक रामदिनलियानी या कार्यालयीन दिवशी अर्जुनी/मोरगाव उपविभागीय कार्यालय येथे सकाळी 11:00 ते दुपारी 1:00 वाजे पर्यंत उपलब्ध राहणार आहेत. तर विधानसभा निवडणुक सबंधाने नागरिकांच्या काही तक्रारी असल्यास नागरिकांनी सामान्य निरीक्षक रामदिनलियानी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन अर्जुनी/मोरगाव चे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वरूणकुमार सहारे यांनी केले आहे.