न फुटलेल्या नारळाचा आवाज धडकला थेट महापालिकेतही!
महादेव कुंभार
लातूर (MLA Abhimanyu Pawar) : लातूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Latur Congress) लातूर शहरात संघ दक्ष झाला असून लातूरचे किल्लेदार म्हणून आता सगळी जबाबदारी विकास पुरुषांच्या खांद्यावर सोपविण्याचे पहिले पाऊल टाकताच त्याचा धसका भाजपापेक्षा काँग्रेसनेच अधिक घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. गंमत म्हणून भाजपाच्या काही लोकांनी लावलेल्या एका फलकामुळे काँग्रेस पूर्ती कासावीस झाली असून त्या फलकावरील विकास कामाच्या न फुटलेल्या नारळाचा आवाज थेट महापालिकेपर्यंत धडकविण्याचे काम काँग्रेसने केले आहे. एकंदर आगामी महापालिका निवडणुकीत भाजपाचे नेतृत्व (MLA Abhimanyu Pawar) आमदार अभिमन्यू पवार यांच्यावर राहील, हे जवळपास आता निश्चित झाले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या मैदानानंतर आता (Latur Congress) लातूर महापालिकेचे रणांगण पेटणार असून विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस अद्यापही अस्वस्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यातच आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लागणार असल्याने या निवडणुकांची तयारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून सुरू होत आहे. लातूरमध्ये विधानसभेला काँग्रेसला निसटता विजय मिळाला. आता महापालिकेत तो मिळवता येऊ नये, यासाठी भाजपाने आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
याचाच एक भाग म्हणून पद्मभूषण डॉक्टर अशोकराव कुकडे यांच्या उपस्थितीत औशाच्याच आमदारांचा लातूरमध्ये सन्मान सोहळा यथास्थिती पार पडला. या सोहळ्यात औशाच्या आमदारांच्या ‘त्रिगुणां’चे कौतुक पार लातूर ग्रामीण व निलंग्याच्याही पलिकडे गेले. इतकेच कमी होते काय, की म्हणून साक्षात् पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज यांनी आता लातूरमध्ये जे जे आहे, तेथे औशालाही हवे, असे सांगून (MLA Abhimanyu Pawar) आमदार अभिमन्यू पवारांचे वजन लातूरकरांमध्ये वाढविले आहे.
काँग्रेस भांबावली आहे का?
एकंदर आमदार अभिमन्यू पवार यांचा एकट्याचा लातूरकरांनी का सत्कार केला? याचे कोडे अद्यापही उलगडले नसले तरी आगामी काळात आमदार पवार हेच जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेते असतील, असाच संदेश या कार्यक्रमातून सोडण्याचा हा संकल्प असावा, असे बोलले जात आहे. (MLA Abhimanyu Pawar) आमदार पवारांची दखल खरे तर काँग्रेसने घेण्याची गरज नव्हती. कारण प्रभाग 14 मध्ये कोणत्याही विकास कामाचे भूमिपूजन, उद्घाटन होणार नव्हतेच!
तेथे एका व्यक्तिगत कार्यक्रमाला आमदार पवार येणार असल्याने ते औचित्य काही कार्यकर्त्यांनी साधले आणि फलक लावले. मात्र या फलकाने काँग्रेस भलतीच कासावीस झाली. ज्या कार्यक्रमाचा नारळच फुटला नाही, तो आवाज मात्र काँग्रेसने परस्परच महापालिका आयुक्तांच्या कानापर्यंत नेला. यामुळे काँग्रेस भांबावली आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.




