चाकूर (MLA Babasaheb Patil) : चाकूर अहमदपूरचा सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येऊन बाबासाहेब पाटलांनी (MLA Babasaheb Patil) इतिहास रचला असून, एका घराण्यातील माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव यांच्यानंतर तब्बल 34 वर्षानंतर बाबासाहेब पाटील आज नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघात महायुतीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील (MLA Babasaheb Patil) यांनी चाकूर अहमदपूरच्या ईतिहासात सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन इतिहास रचला असुन तीस हजार मतांनी विजयी झाल्याचे फलित होणार आसुन ते आज मंत्री म्हणून नागपूर येथे शपथ घेणार व चाकूर अहमदपूरला मंत्रिपद मिळणार हे निश्चित मानले जात आहे. या दोन्ही तालुक्यातील जनता बाबासाहेब पाटील यांना मंत्रीपद मिळणार ही आशा मात्र शिगेला पोहोचली आहे.
यापूर्वी १९७२ ते १९८५ पर्यंत शेकापचे स्वर्गीय भाई किशनराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे तीनदा नेतृत्व करून राज्यमंत्री राहिले. १९८५ ला काँग्रेसचे रामचंद्र पाटील हे आमदार झाले. त्यानंतर १९९० ला बाळासाहेब जाधव यांनी काँग्रेसकडून अहमदपूर विधानसभेचे आमदार (MLA Babasaheb) म्हणून नेतृत्व केले. ते उदगीर मतदारसंघात दोनदा विजय मिळवून महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते. त्यामुळे तब्बल 34 वर्षानंतर बाबासाहेब पाटील हे नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्यामुळे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत नागपूरकडे रवाना झाले आहेत.