वर्धा (Wardha) :- रामनवमीच्या दिवशी देवळी येथील प्रभू रामचंद्राच्या मंदिरात (Lord Ramachandra Temple) भाजपचे माजी खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) यांना सोहळे घालून नसल्याने पुजाऱ्याने गर्भगृहात जाण्यास मज्जाव केला. याची तक्रार थेट भाजपचे देवळी येथील आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्र्याकडे (chief Minister) केली .
माजी खासदारांना राम मंदिरात रोखण्याची दिली माहिती
मंदिरात काल झालेल्या प्रकाराने सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. याबाबत आमदार बकाने (MLA Bakane) यांनी देशोन्नतीशी (Deshonnati) बोलताना सांगितले की मंदिरातील एक ट्रस्टी चामड्याचा पट्टा घालून मंदिराच्या (Lord Ramachandra Temple) गर्भगृहात जाऊ शकतो. मग इतरांना प्रवेश नाकारण्याचा यांना काय अधिकार आहे. मंदिर हे सर्वांचेच आहे. त्यामुळे दर्शन नाकारण्याचा यांना कोणी अधिकार दिला असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या मंदिरात दरवर्षी लग्नकार्य व इतर समारंभ होत असतात. या माध्यमाने मंदिराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ सुद्धा होतो. तरीसुद्धा रामनवमीच्या दिवशी प्रसाद वाटायला त्यांच्याकडे आर्थिक तरतूद नसते. याबाबत त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या मंदिराजवळ 150 एकर जमीन आहे. सध्या (Lord Ramachandra Temple) मंदिराकडे किती जमीन आहे. उर्वरित जमिनीचे काय केले. या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा लेखाजोखा आता धर्मदाय आयुक्तकडे मागणार आहेत.
विशेष म्हणजे (Lord Ramachandra Temple) मंदिरासाठी स्वर्गीय गोटेसिंह जावंधीया यांनी जागा दान दिली होती. अशी माहिती त्यांच्या परिवारातील एका सदस्याने दिली. मंदिरातील बांधकाम करताना नगरपरिषदेची परवानगी सुद्धा घेतली नसल्याची माहिती पुढे येत आहेत. रामनवमीच्या दिवशी माजी खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas) आपल्या कुटुंबासह दरवर्षी दर्शनाला जात असतात. यावेळी मात्र तेथील पुजाऱ्याने त्यांना गर्भगृहात जाण्यास रोखले होते. त्यांनी या मंदिराला कित्येकदा मोठ्या देणग्या सुद्धा दिलेल्या आहेत. यापूर्वी असा प्रकार कधीही घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेचे त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.
महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभेने निःशेष जाहीर केला. संस्थेचे प्रतिनिधी यांनी एका व्हिडिओद्वारे निषेध व्यक्त करीत. हे प्रकरण पूर्वनियोजित आहे असा आरोप केला. या ट्रस्टीला तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी केली.
