संघटनेच्या सूचने शिवाय सहभागी होऊ नये : सुनील गफाट (भाजपा जिल्हाध्यक्ष)
वर्धा (MLA Dadarao Keche) : आर्वी मतदार संघाचा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. आमदार दादाराव केचे (MLA Dadarao Keche) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्तीय सुमित वानखेडे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान आमदार दादाराव केचे यांनी मतदार संघातील कार्यकर्त्यांना सोमवारी 28 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संदेश दिला आहे.
आमदारांच्या संदेशाने आर्वी मतदारसंघातील भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी संभ्रमात पडलेले आहे. उमेदवारांची दुसरी यादी काल प्रकाशित झाली. मतदार संघातील कार्यकर्ते आपल्या उमेदवाराचे नाव यात आहे काय याचा शोध घेत होते. आर्वी चा उल्लेख नसल्याने उमेदवार बदलु शकतो अशी चर्चा सुरू झाली. सायंकाळी केचे यांनी 28 तारखेला उमेदवारी दाखल करणार असे मेसेज मोबाईलवर पाठवले. यामध्ये भाजपाचे चिन्ह नव्हते. त्यामुळे केचे अपक्ष उभे राहतील काय अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली. याची माहिती केचे यांना मिळाल्यावर त्यांनी आज चिन्हासह पुन्हा मेसेजेस पाठवले. उमेदवारी जाहीर न होता अर्ज कसा दाखल करणार हा चर्चेचा विषय मतदार संघात सुरू झाला.
या संदर्भात जिल्हाध्यक्ष सुनील गपाट यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही कमळा सोबत आहोत. उमेदवारी कोणालाही मिळो आम्ही त्यांच्यासोबत राहु .
जोपर्यंत केंद्रीय समितीकडून उमेदवारी निश्चित होत नाही तोपर्यंत कोणत्याही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊ नये, असे (Sudhir Dive) त्यांनी देशोन्नतीशी बोलताना सांगितले.
हिंगणघाट व देवळी मतदारसंघात अर्ज दाखल करताना जिल्ह्यातील अनेक नेते उपस्थित होते हे विशेष. दरम्यान दादाराव केचे (MLA Dadarao Keche) यांनी उद्या 28 ला कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवाराचे नाव निश्चित झाल्याने भाजपचा उमेदवार कोण ? याबद्दल उत्कंठा वाढलेली आहे. आज सायंकाळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांच्यासोबत दादाराव केचे (MLA Dadarao Keche) यांची बैठक होणार असल्याचे भाजपचे वर्धा जिल्हा निवडणूक प्रमुख सुधीर दिवे (Sudhir Dive) यांनी सांगितले. या बैठकीनंतरच मतदार संघातील कार्यकर्त्यांना सूचना केल्या जाईल.