शेलसूर (Teacher’s Day with MLA Dhiraj Lingade) : शिक्षक दिनाचे ओचीत्य साधत अमरावती पदवीधर मतदार संघाचे आमदार धीरज लिंगाडे (MLA Dhiraj Lingade) यांनी शेलसूर येथे श्री शिवाजी हायस्कूल व कमवि शेलसूर येथे सदिच्छा भेट देत विद्यार्थी व शिक्षकांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी शिक्षक दिनी (Teacher’s Day) इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांनींंकडून राबवण्यात येत असलेल्या स्वयं शासन उपकमाचे त्यांनी विशेष कौतूक केले. तर शाळेच्या कामकाजाची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी शाळेच्या वतीने मुख्याध्यापक डी. एम. कापसे व सुनिल सपकाळ यांनी त्यांचे स्वागत केले.