संस्थाचालक पक्षांचे असलेतरी विद्यार्थी नि:पक्षच; म्हणून भेदभाव नाही!
बुलढाणा (Teachers’ Day) : 5 सप्टेंबर माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (Dr. Sarvapalli Radhakrishnan) यांची जयंती, ती साजरी केली जाते शिक्षकदिन म्हणून. याच (Teachers’ Day) शिक्षकदिनी आ.धिरज लिंगाडे (MLA Dhiraj Lingade) चिखली तालुक्यातील शेलोडी या दुर्गम गावी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक तथा विद्यार्थ्यांसमवेत चांगलेच रमले. याप्रसंगी त्यांनी शिक्षणात शिक्षकांचे महत्व हे विषद करुन, आपण पदवीधर मतदार संघाचे आमदार बनल्यापासून रस्ते, नाल्या या बाबींना निधी देण्याचे टाळत तो निधी शैक्षणिक कामासाठी देतांना ती संस्था कोणत्या पक्षाची आहे, याचा विचार न करता शाळेतील विद्यार्थ्यांकडे पाहून आपण निधी देत असतो. संस्थाचालक हे जरी विविध राजकीय पक्षांशी संबंधीत असले तरी विद्यार्थी मात्र नि:पक्ष असतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
चिखली तालुक्यातील शेलोडी येथे आज ५ सप्टेंबरला शिक्षक दिन (Teachers’ Day) आगळ्या-वेगळ्या पध्दतीने साजरा करण्यात आला. शिक्षक शाळेत येताच विद्यार्थ्यांनी त्यांना पुष्पहार घालत व त्यांच्यावर पृष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले, या सोहळ्याचे साक्षीदार ठरले ते, आ. धिरज लिंगाडे (MLA Dhiraj Lingade). त्यांनीही शिक्षकांचे स्वागत करुन, शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण तत्पर असल्याचे सांगितले.
सर्वप्रथम शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक ,गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तींनी ढोल ताश्यांच्या गजरात शिक्षकांची भव्य दिव्य मिरवणूक काढून शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर सर्व शिक्षकांचा शाल- श्रीफळ पुष्पहार घालून यथोचित सन्मान करून शिक्षकांच्या अंगावर विद्यार्थी व पालकांनी पुष्पवृष्टी करून सर्व शिक्षकांना सन्मानपूर्वक स्थानापन्न केले. उद्घाटक म्हणून अमरावती पदवीधर शिक्षक मतदार संघाचे विद्यमान आमदार धिरजभाऊ लिंगाडे, पत्रकार राजेंद्र काळे, प्रमुख अतिथी म्हणून चिखली पं. स.चे गटशिक्षणाधिकारी आर. आर. पाटील, शेलसुर केंद्राचे केंद्रप्रमुख अनाळकर, ग्रामसेवक पाटील, शिवसेना नेते कैलास भालेकर,सेवानिवृत्त विस्तार अधिकारी सुरेश जोशी, डिगांबर नेमाने, डॉ. घाडगे, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख रामदास घाडगे, सेवानिवृत्त प्राचार्य पवार, विशाल नेमाने, विठ्ठल जगदाळे, सागर कदम तसेच मान्यवर उपस्थित होते.
एकीकडे सरकारी शाळा ओस पडत असताना चिखली तालुक्यातील जि.प. म.उ.प्रा. शाळा शेलोडी ही सन २००९ पासून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव अग्रेसर असणारी, नाविन्यपूर्ण उपक्रमशील शाळा ठरलेली आहे. शाळेचे मागील ४ वर्षात स्पर्धा परीक्षेतून ३१ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत झळकले आहेत तर ५ विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतन अमरावती येथे प्रवेशित आहेत, तसेच सन २०२२ मध्ये ४ विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून प्रवेशित आहेत, २०२३ मध्ये ४ विद्यार्थ्यांनी परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून प्रत्येकी ९६०० सारथी शिष्यवृत्ती मिळवली आहे. अशा उपक्रमशील आदर्श शाळेला संजय शेळके, प्रदिप रिंढे, शिवाजी देशमुख, ज्ञानेश्वर सावळे, समाधान जाधव, अमरदिप जयशेट्टे असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारे शिक्षक लाभले. (Teachers’ Day) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेषराव घेवंदे यांनी तर आभार प्रदर्शन सेवानिवृत्त शिक्षक संभाजी जाधव यांनी केले.
आ. धिरज लिंगाडे (MLA Dhiraj Lingade) यांनी जिल्हा परिषद शाळेचा परिसर पाहून शाळेचे उल्लेखनीय कार्य, ग्रामस्थांचा शाळेच्या विकासात्मक कार्यात सहभाग, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा चढता आलेख बघून शाळेला आवश्यकतेनुसार डिजिटल संसाधने देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच समाधान रिठे, उपसरपंच रामेश्वर घाडगे तथा सर्व सदस्य, माजी सरपंच श्रीरंग घाडगे, रामेश्वर शेवाळे, तंटामुक्ती अध्यक्ष रामधन शेवाळे, रामधन मोरे तसेच संपुर्ण पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.