मानोरा (MLA Dr. Babusingh Maharaj) : बंजारा काशी तिर्थक्षेत्र पोहरादेवी येथील दिवंगत धर्मगुरु संत डॉ रामराव महाराज यांचे वंशजातील पिठाधिश्वर बंजारा समाजाचे धर्मगुरु तथा विधान परिषदेचे आमदार डॉ बाबुसिंग महाराज यांना दि. ७ डिसेंबर रोजी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.
यापूर्वी बंजारा समाजाचे थोर धर्मगुरु दिवंगत बाल ब्रम्हचारी संत डॉ रामराव बापू महाराज यांना सुध्दा डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आलेले आहे. शनिवारी धर्मगुरु आमदार बाबुसिंग महाराज यांना सुध्दा डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आल्याने देशभरातील बंजारा समाज बांधवामध्ये आनंद व्यक्त होत आहे.
संत डॉ रामराव बापू महाराज यांच्या आशीर्वादाने संपूर्ण देशासह संपूर्ण महाराष्ट्र राज्य भ्रमण करुन समाजाचा विकास व गोर बंजारा बांधवांना व्यसन मुक्त करण्यासाठी अहोरात्र कष्ट करणार असा संदेश समाज बांधवांना धर्मगुरु आमदार बाबुसिंग महाराज यांनी दिल्याची माहिती भाजपा प्रदेशचे युवा पदाधिकारी भक्तराज महाराज राठोड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीने विचारले असता दिली.