राष्ट्रसंतांचे प्रचारक तथा माळी समाजाचे ज्येष्ठ नेते नानाजी वाढई यांचे प्रतिपादन
गडचिरोली (MLA Dr. Devrao Holi) : आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याही आमदारांनी माळी समाजाचा मेळावा (Mali Samaj) घेऊन अशाप्रकारे समाजाचे नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केला नाही. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) यांनी माळी समाज बांधवांना घेऊन माळी समाजामध्ये नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांनी जिल्ह्यात केलेली विकास कामे ही कौतुकास्पद असून त्यांच्यामध्ये जिल्ह्याच्या विकासाची दृष्टी असणारे नेतृत्व दिसून येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रसंतांचे प्रचारक तथा (Mali Samaj) माळी समाजाचे ज्येष्ठ नेते नानाजी वाढई यांनी गडचिरोली येथे आयोजित माळी समाजाच्या मेळाव्याच्या प्रसंगी केले.
यावेळी आ. डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) यांनी उपस्थित बांधवांना मार्गदर्शन केले व मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होऊन आपल्यावर व्यक्त केलेल्या प्रेमाबद्दल (Mali Samaj) माळी समाज बांधवांचे आभार मानले.
माळी समाज व आ. डॉ. देवराव होळी (MLA Dr. Devrao Holi) मित्र परिवाराच्या वतीने गडचिरोली शहरातील गानली सभागृहात (Mali Samaj) माळी समाज बांधवांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवून मेळाव्याला उदंड प्रतिसाद दर्शविला. यावेळी प्रामुख्याने विलास जेंगठे, नीलकंठ निकुरे, मनोज जेंगठे, प्रमोद पिपरे, मुक्तेश्वर काटवे, दशरथ चांदेकर, बापू लेनगुरे, नंदू मांदाडे, अशोक सोनुले, आकाश निकोडे, टिकाराम गावतुरे, बालाजी पा. जेंगठे, श्याम वाढई उपस्थित होते.