कळमनुरी/हिंगोली (MLA Dr. Pragya Satav) : विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव (MLA Dr. Pragya Satav) यांचा कळमनुरी शहरात दि.२९ ऑगस्ट रॅली काढून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यानंतर डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांनी नागरिकांशी जनसंवाद साधला.
विधान परिषदेतील निवडणुकीत नवनिर्वाचित झालेल्या आमदार डॉ. प्रज्ञाताई राजीव सातव यांचा कळमनुरी शहरात भव्य नागरी सत्कार व जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक हफिस फारुकी व माजी नगरसेवक निहाल कुरेशी यांच्या वतीनेदि.२९ ऑगस्ट गुरुवार रोजी करंडे कॉम्प्लेक्स नवीन बस स्टँड जवळ येथे करण्यात आले होते. या वेळी तालुका काँग्रेस कमिटी, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ,औंढा नगरपंचायत, मसोड ग्रामपंचायत, महिला आघाडी, सेवा दल, व्यापारी महासंघ, पत्रकार संघ कुरेशी बिरादरी, या सर्व विविध संघटनांनी आमदार डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव यांचा सत्कार केला.
या सत्काराला उत्तर देताना डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव (MLA Dr. Pragya Satav) म्हणाल्या की, आपण केलेल्या सत्कारामुळे माझे मन भारावून गेले आहे मी कोणत्याही मोठ्या पदावर गेले तरी तुमचे ऋन कधीही विसरणार नाही. यानंतर त्यांनी नागरिकांशी जनसंवाद साधला. तत्पूर्वी नवीन बस स्थानक परिसरात जेसीबी द्वारे डॉ.प्रज्ञाताई राजीव सातव (MLA Dr. Pragya Satav) यांच्यावर फुलांची उधळण करून जेसीबीच्या साह्याने हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पक्ष निरीक्षक सचिन नाईक, जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मारोतराव खांडेकर, जकी कुरेशी, डॉ.सतीश पाचपुते, सुवर्णा गाभणे,अॅड. अझरोद्दीन कादरी, आय्युब पठाण, भगवान खंदारे, नागोराव करंडे, सुरेश कांडलीकर, अजगर पटेल, वनिता गुंजकर,सादेक नाईक,हमीदुल्ला पठाण,तन्वीर नाईक,अरुण वाढवे, उमर फारुख शेख, शेख मतीन, शेख फय्याज, बबलू पठाण, डॉ.एल.डी. कदम, अॅड. इलियास नाईक, विलास गोरे, नितीन जिंतूरकर, राजू पाटील, साहेबराव पाटील, वाजेद पठाण,बबन डुकरे, बिलाल कुरेशी, उमाकांत शेवाळकर, कलीम अन्सारी, समीर कुरेशी, नदीम कुरेशी, आमेर फारुकी, अरबाज कुरेशी यासह शेकडो काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण माजी नगरसेवक अ.हफिज फारुकी,माजी गटनेता निहाल कुरेशी यांनी परिश्रम घेतले.
आपले कार्य भूमीत सत्कार पाहून आ डॉ.प्रज्ञाताई सातव झाल्या भावुक
विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव (MLA Dr. Pragya Satav) यांच्या नागरी सत्कार सोहळ्यानिमित्त मोठी रॅली काढण्यात आली होती ही रॅली बस स्थानक परिसरामध्ये येताच आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्यावर जेसीबी द्वारे फुलाची उधळण करण्यात आली त्यांचा हा होत असलेला सत्कार पाहून याप्रसंगी आमदार डॉ.प्रज्ञाताई सातव यांच्या डोळ्यामध्ये आश्रु आले व त्या लगेच भावुक झाल्याचे पहावयास मिळाले.