पुसद (MLA Indranil Naik) : गेल्या दोन दिवसा अगोदर पुसद विधानसभा मतदारसंघ (Pusad Assembly) अंतर्गत येत असलेल्या काळी दौ. परिसरातील सेवादासनगर,ब्रह्मी,वडद या गावामध्ये दोन दिवसापूर्वी झालेल्या वादळामुळे नुकसानग्रस्त (natural calamity) ग्रामस्थांना शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची ग्वाही आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) यांनी नुकसानग्रस्त गावांची पाहणी करताना ग्रामस्थांना दिली. यावेळी परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वादळ वाऱ्यामुळे अनेक घर उध्वस्त तर अनेक घरावरील टीन पत्रे उडून गावातील अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. त्याशिवाय उडालेल्या पत्रांमुळे, काही जनावरे जखमी झाली आहे.
गावांना तातडीने भेट देऊन आ. इंद्रनील नाईक (Indranil Naik) झालेल्या नुकसानीची पाहणी केली व नुकसान ग्रस्त गावकऱ्यांना व शेतकऱ्यांना दिलासा दिला. याप्रसंगी आमदार महोदय यांनी प्रत्यक्ष नागरिकांसमोर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ शासनाकडे अहवाल पाठविण्याचे निर्देश तहसीलदारांना दिले. शेतकरी बांधवांची खरीप हंगामाच्या पेरणीची लगबग सुरू असताना, अनपेक्षित पणे आलेल्या या (natural calamity) नैसर्गिक संकटामुळे या गावातील शेतकरी अधिकच अडचणीत आल्याचे दिसून येत आहे, राज्य शासनातर्फे झालेल्या नुकसानीची दखल घेऊन तहसीलदारांची पंचनामे शासन दप्तरी पोहोचतात या शेतकऱ्यांना शक्य ती आणि सर्वतोपरी मदत मिळवून देण्याची गवाही आ. इंद्रनिल नाईक (Indranil Naik) यांनी गावकऱ्यांना दिली. यावेळी (Pusad Assembly) पुसद मतदारसंघासह महागाव तालुक्यातील महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.