नाईक कुटुंबावर निराधार व बिनबुडाचे आरोप करणाऱ्या माजी आ. संदीप बाजोरिया वर मानहानीचे गुन्हे दाखल करा
पुसद (MLA Indranil Naik) : यवतमाळ येथे पत्रकार परिषद घेऊन माजी आ. संदीप बाजोरिया (Sandeep Bajoria) यांनी माजी मंत्री व लोकनेते मनोहर नाईक पुसद विधानसभा मतदारसंघाचे आ. इंद्रनील नाईक (MLA Indranil Naik) यांच्या बद्दल बिनबुडाचे व निराधार आरोप केले होते. ते त्या पत्रकार परिषद मध्ये म्हणाले की, यवतमाळ येथील भूमाफियाने लोकनेते माजी मंत्री मनोहर नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांना कॉलर पकडून मारहाण केली होती. घर पाडण्याचा प्रयत्न केला होता. अखेर मीच मध्यस्थी केली होती.
संतप्त नागरिकांची उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे मागणी
अशा प्रकारचे निराधार व खोटे बिनबुडाचे आरोप केले होते. आमचे श्रद्धास्थान माजी मंत्री मनोहर नाईक आमदार इंद्रनील नाईक (MLA Indranil Naik) यांच्यावर असे खोटे आरोप करणाऱ्या माजी आमदार संदीप बाजोरियांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून कारवाई करावी तर आमदार इंद्रनील नाईक यांच्यावर खोटे आरोप करणाऱ्यावर लोकप्रतिनिधी कायद्यान्वये कारवाई करण्यात यावी. आमचे आराध्य दैवत माजी मंत्री म्हणून नाईक यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यांच्यावर मानहानीची गुन्हे दाखल करण्यात यावे.
या निवेदनावर धनंजय सोनी, राजेश साळुंखे, अभय राठोड, अशोक वडते, विनोद चव्हाण, शशांक नाईक, दिनेश राठोड, अरविंद चव्हाण, प्रा. संजय चव्हाण, श्रीकांत चव्हाण,अरुण राठोड, सुनील गुद्दटवार, विशाल ढाले,सुनील ढाले, शेख कौसर, अभिजीत पानपट्टे, करण ढेकळे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने माजी मंत्री मनोहर नाईक व आमदार इंद्रनील नाईक यांचे समर्थक उपस्थित होते. संतप्त कार्यकर्त्यांनी कै. नाईक (MLA Indranil Naik) चौक येथून मोर्चाद्वारे उपविभागीय कार्यालय गाठले, या ठिकाणी माजी आमदार संदीप बाजोरिया (Sandeep Bajoria) यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. व नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.