अमरावती (MLA Kiran Sarnaik) : अमरावती विभागाचे शिक्षक आमदार एड. किरण सरनाईक यांची मा. उपसभापती, महाराष्ट्र विधान परिषद, यांनी विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाच्या कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ हा पुढील दोन वर्ष म्हणजे ६ डिसेंबर, २०२६ पर्यन्त राहणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (Agricultural University), अकोलाच्या शीर्ष समितीवर निवड झाल्यामुळे, विदर्भातील शेतकऱ्यांसाठी उपयुक्त संशोधन, कृषी विद्यापीठातील शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी यांच्या समस्या सोडविण्यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, अशी ग्वाही (MLA Kiran Sarnaik) आ. किरण सरनाईक यांनी दिली आहे.