आ. नरेंद्र भोंडेकर यांनी घेतला सर्वेचा आढावा
भंडारा (MLA Narendra Bhondekar) : नगर परिषद क्षेत्र अंतर्गत च्या एकूण १६४०० घरांचे सर्वे करायचे निर्देश देताच कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रविवारी नगर परिषदेने प्रायोगिक तत्वावर प्रभाग क्र. दोन ते पाच सह १५ आणि १६ क्रमांकाच्या प्रभागाचे १२० घरांचा द्रोण द्वारे सर्वे केला. यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी स्वतः जातीने उपस्थित राहून सर्वेचा आढावा घेतला. प्रायोगिक तत्वावर झालेल्या या सर्वे नंतर पुढील आठवड्यात शहरातील अन्य भागाच्या मुख्य सर्वेची सुरुवात करणार असल्याचे यावेळी न.प.च्या मुख्याधिकारी करण कुमार यांनी सांगितले.
तब्बल ११२ वर्ष लोटली तरीही भंडारा शहराचा सर्वेचा प्रश्न रेंगळतच होता. आ. नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांनी या विषयावर चर्चा केली असता त्यांच्या लक्षात आले की शहरातील नगरिकांकरिता महत्वपूर्ण असून हे काम फक्त तीन कोटी ४० लक्ष रूपयांच्या निधीकरीता रखडलेले आहे. ज्यावर त्यांनी नगर परिषदेला एक कोटी रुपये भरून सर्वे सुरु करण्याचे निर्देश दिले. या निर्देशावर नगर परिषदेने तत्काल प्रस्ताव सादर करून निधीला मंजूरी दिली आणि कामास सुरवात केली. या अंतर्गत रविवारी नगर परिषदेने प्रायोगिक तत्वावर शहरातील प्रभाग क्र. दोन ते पाच आणि १५ व १६ या प्रभागांचा सर्वे करून १२० घरांची नोंद केली. गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या सर्वेच्या प्रश्नाला मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून याकरीत आ. भोंडेकर यांचे आभार मानले जात आहे.
उल्लेखनीय आहे की, भंडारा नगर परिषदेच्या क्षेत्रांतर्गत १९१२ साली सर्वे करण्यात आला होता. इंग्रज काळात झालेल्या सर्वेनंतर या क्षेत्राचे सर्वे न झाल्यामुळे नगर परिषद क्षेत्रांतर्गत १६४०० परिवार नगर परिषदेच्या हद्दी बाहेरच आहेत. ज्यामुळे आजही वरील सर्व निवासी हे अतिक्रमणधारक म्हणविले जात आहे. अशात आ. नरेंद्र भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांच्याद्वारे हा विषय गांभीर्याने हाताळून सर्वे सुरू करण्याचे निर्देश दिल्या गेले होते. यात भंडारा नगर परिषद हद्देतील पिंगलाई येथील ३२००, गणेशपूरचे ५०००, केसलवाडाचे १२०० व भंडारा खास येथील ७००० असे एकूण १६४०० घरांचे सिटी सर्वे करावयाचे आहे. आ. भोंडेकर (MLA Narendra Bhondekar) यांच्या निर्देशानंतर शहरात सिटी सर्वेला सुरुवात झाली असून लवकरच हा सर्वे पूर्ण होऊन १६४०० परिवारांना हक्काचे घर मिळू शकणार आहे.