महाविकास आघाडीच्या आमदारांनी राज्य सरकारवर डागली टिकास्त्रे
शेतकरी हक्कासाठी हजारो शेतक-यांनी दिल्या निवेदनावर स्वाक्ष-या
चिखली (MLA Rahul Bondre) : जगाचा पोषिंदा असलेल्या बळीराजा जिवन जगावे की नाही या चक्रव्हिवात अडकलेला असतांना आज राज्यात दररोज 6 हुन अधिक शेतक-यांच्या आत्महत्या होत असुन सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच शेतक-यांचे मरण झाले आहे. सन 2014 च्या यवतमाळ येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्चाच्या दुप्पट भाव देवुन असे जाहीर केले होते/ मात्र आता दुप्पट तर नाहीच हमी भावा पेक्षाही कमी भाव मिळत असल्याची खंत व्यक्त करून जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे (MLA Rahul Bondre) यांनी 4 हजार शेतक-यांचे निवेदन तहसिलदार यांच्या मार्फत दिले आहे.
मौर्चात आसुड हाती घेवुन स्वतःला बडवून घेणारे शेतकरी ठरले आर्कषन
आज जिल्हा दौ-यावर असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री ना.शिंदे यांना स्वतः सह 2500 शेतक-यांच्या रक्ताच्या स्वाक्षरीनिषी शेत मालाला योग्य भाव मिळावा म्हणुन तयार केलेले निवेदन बुलडाणा येथे देण्यात येणार असल्याची घोषणा चिखली येथे केली. यावेळी मोर्चात उपस्थितीत असलेल्या हजारो शेतक-यांना संबांधीत करतांना ते म्हणाले की, सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हेच ख-या अर्थाने शेतक-यांचे मरणं ठरत असुन येत्या काळात शेतक-यांसाठी रस्त्यावर रक्त सांडण्याची तयारी असल्याचे विधान माजी (MLA Rahul Bondre) आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी आपल्या भाषनातुन व्यक्त केली.
असंख्य शेतक-यांनी दौराच्या सहायाने स्वतःच्या गळयाला लावलेला फास लक्षणीय
या शेतकरी संघर्ष मोर्चात (Farmer Sangharsh Morcha) कॉग्रेसचे नेते अॅड. गणेषराव पाटील, श्यामभाउ उमाळकर, विजय अंभोरे, आमदार धिरज लिंगाडे, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राणा दिलीपकुमार सानंदा, षिवसेना उबाठाचे नेते प्रा.नरेंद्र खेडेकर, जालींधर बुधवत, लक्ष्मणराव घुमरे, नंदुभाउ बोरे, ज्योतीताई खेडेकर, राष्ट्रवादीचे नरेष शेळके, दिलीपरव जाधव, संजय गाडेकर, भाई प्रदिप आंभोरे आदी मान्यवरांची व्यसपिठावर उपस्थिती होती. या (MLA Rahul Bondre) मोर्चा दरम्यान केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात देषाच्या राष्ट्रपती यांना तहसिलदार चिखली यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.