देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: MLA Rahul Bondre: राहुल भाऊ बोंद्रेच्या सामाजिक बांधिलकीने दिली कामगारांना कीटची हमी
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > MLA Rahul Bondre: राहुल भाऊ बोंद्रेच्या सामाजिक बांधिलकीने दिली कामगारांना कीटची हमी
विदर्भबुलडाणा

MLA Rahul Bondre: राहुल भाऊ बोंद्रेच्या सामाजिक बांधिलकीने दिली कामगारांना कीटची हमी

Deshonnati Digital
Last updated: 2024/10/13 at 8:16 PM
By Deshonnati Digital Published October 13, 2024
Share
MLA Rahul Bondre

देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (MLA Rahul Bondre) : ‘अरे संसार – संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताले चटके तवा मिळते भाकर’ .. या सर्वसामान्यांचे, कामगारांचे आयुष्य विशदं करणाऱ्या कवीयत्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी चिखली विधानसभा मतदारसंघात कामगारांना संसार – बाटली कीट मिळवण्यासाठी किती संघर्ष करावा लागत आहे, याची आठवण करुन देतात. ऐन दसरा सणाला सत्ताधारी आमदाराच्या मुजोरीपणामुळे शेकडो कामगार बांधवांवर उपसामारीची वेळ आली असता, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे (MLA Rahul Bondre) यांनी सामाजिक बांधलीकी जपल्याचे पाहावयास मिळत आहे.

संसार – बाटली कीटच्या प्रतिक्षेत दसरा सणाच्या दिवशी सकाळी ९ ते रात्री १० ताटकळत बसलेल्या शेकडो कामगारांची नास्ता पाणी व जेवणाची व्यवस्था राहुल भाऊ बोंद्रे (MLA Rahul Bondre) यांनी करुन दिली. एवढ्यावरच न थांबता कामगार बांधवांसोबत दसरा साजरा करुन त्यांना संसार बाटली कीट मिळवून देण्याची हमी तर दिलीच शिवाय आक्रमक होत संसार बाटली किटसाठी कोरा धनादेश घेऊन जा.. मात्र आता घरी जाऊन कुटुंबासोबत दसरा साजरा करा असे आवाहन केले. तद्नंतर संसार बाटली कीटसाठी १३ तास ठिय्या धरलेलेल कामगार घरी परतले, हे शनिवारी चिखलीकरांना याची देही- याची डोळा अनुभवता आले.

राज्य शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम कामगारांना किचन सेट व सुरक्षा किटचे वाटप करण्यात येते. मात्र चिखली विधानसभा मतदारसंघात ही सरकारी योजना सत्ताधारी आमदार स्वत:च्या घरच्या असल्याप्रमाणे राबवत आहे. बांधकाम कामगारांना देण्यात येणाऱ्या संसार – बाटली संचावर आमदाराचे स्टिकर लावल्या जात आहे. बांधकाम मजूरांना घरपोच साहित्य पुरवण्याचा शासकीय नियम असतांना राजकीय कार्यक्रमाला बोलवून त्यांची दिशाभूल केली जाते. शुक्रवारी अनेक कामगारांची राजकीय कार्यक्रमासाठी उपस्थिती दाखवण्यात आली. पण मात्र त्यांना कीट देण्यात आली नाही. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी शेकडो कामगारांना ऐन दसरा सणाला किट घेण्यासाठी बोलावले मात्र त्यांना कीट न मिळाल्याने ऐन दसरा सणाला उपाशी राहावे लागल्याची ही दुर्दैवी बाब आहे. सरकारी योजना ही काही कुणाची जहागिरदारी नसते, यापुढे बांधकाम कामगारांना घरपोच किट वितरीत करावी अन्यथा काँग्रेसचे पदाधिकारी कीट वाटपाचे स्वार्थी राजकीय कार्यक्रम उधळून लावतील असा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे (MLA Rahul Bondre) यांनी दिला.

आमदार कार्यालयातून फोन आल्यानंतर शनिवार १२ ऑक्टोबर रोजी तालुका क्रीडा संकुल येथे शेकडो कामगार बांधव कीट घेण्यासाठी आले होते. सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत उपाशीपोटी थांबूनही त्यांना कीट न मिळाल्याने जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी आक्रमक पवित्रा घेत तब्बल दहा १३ ठिया आंदोलन केले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलतांना राहुल बोंद्रे (MLA Rahul Bondre) म्हणाले की, कीटचे वाटप करतांना कामगार बांधवांचा आत्मसन्मान राखला पाहिजे, कामगार बांधवासाठी हे भीक नसून त्यांचा हक्क आहे. कामगार सेझ मधून सरकार ही योजना राबवते मात्र ही शासकीय योजना प्रायव्हेट लिमिटेड झाली असून सत्ताधारी आमदार कामगारांवर उपकार केल्याचे चित्र निर्माण करत असल्याचेही राहुल बोंद्रे म्हणाले.

आम्ही स्वत: हून आलो नाही तर आमदारच्या कार्यालयातून फोन आले

चिखली विधानसभा मतदारसंघातील शेकडो कामगारांनी त्यांच्या व्यथा राहुल बोंद्रे यांच्याकडे मांडल्या शुक्रवारी आम्हाला राजकीय कार्यक्रमात बोलावण्यात आले. दिवसभर आम्ही त्यांची नुसती भाषणे ऐकली. कार्यक्रमानंतर आम्हाला कीट वाटप होणार असे सांगण्यात आले होते. मात्र किट वापट न करता पुन्हा शनिवारी दसऱ्याच्या दिवशी तालुका क्रीडा संकुल चिखली येथे बोलवण्यात आल्याचे शेकडो कामगार बांधवानी सांगितले. ऐन सणाच्या दिवशी सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत आम्ही थांबलो पण आम्हाला कीट मिळाली नाही. परिणामी सोयाबीन सोंगण्याच्या या हंगामात आमचे तीन हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा रोषही कामगारांनी व्यक्त केला.

कीट वाटपाचे राजकीय कार्यक्रम उधळून लावणार

राजकीय कार्यक्रमात गर्दी जमवण्यासाठी कामगारांना बोलावून संसार – बाटली साहित्य वाटल्या जाते. यामध्ये मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी होत आहे. अनेक महिलांना गर्दीत धक्काबुक्की होत असल्याचे निंदनीय चित्र आहे. कामगारांना घरपोच साहित्य दिले पाहिजे, असा नियम असून त्यासाठी वाहतुकीसाठी दिलेले पैसेही आकारले जातात. मात्र फक्त स्वार्थाच्या राजकारणासाठी कामगारांचा आत्मसन्मान चिरडला जात आहे. कामगारांच्या यापुढे घरपोच संसार – बाटली किट वाटप केली नाही तर काँग्रेस पदाधिकारी कीट वाटपाचे राजकीय कार्यक्रम उधळून लावतील असेही राहुल भाऊ बोंद्रे यांनी सांगितले.

यावेळी अॅड.सौ. वृषालीताई बोंद्रे, शहर अध्यक्ष अतहरोद्यीन काझी, कार्याध्यक्ष निलेष अंजनकर, डॉ. मोहमंद इसरार, कुणाल बोंद्रे, दिपक देषमाने, नंदुभाउ सवडतकर, बाळासाहेब गांवडे, प्रदिप पचेरवाल, सतिष षिंदे, अंजु ठेंग, प्रमोद पाटील, रवि तोडकर, रफिकसेठ संगिताताई गाडेकर, राजु रज्जाक, विजय गाडेकर, गोकुळ षिंगणे, दिपक थोरात, विलास कंटुले, गोपाल देव्हडे, अमिनखॉ उस्मानखॉ, सरपंच मनोज लाहुडकर, रिक्की काकडे, राहुल सवडतकर, जय बोंद्रे, विजय जागृत, डिगांबर देषमाने, दिलीप चवरे,पवन गावारे, शहेजाद अली खान, डॉ. अमोल लहाने, बिदुसिंग इंगळे, अॅड विलास नन्हई, षिवराज पाटील, रोहन पाटील, खलील बागवान, आरिफ बागवान, आष्विन जाधव, शेैलेष आयया, शंकर मलवार, विनायक सरनाईक, सुरेष बोंद्रे, मलीक जमदार, जक्का भाई, बाषिद जमदार, अजु शेख, जाकीर भाई, सोहेल शेख, रमजान चौधरी, मोहीत घुगे, सलीम मनीयार, अब्रार बागवान, पप्पु जागृत, भारत देषमाने, देविदास लोखंडे, आनंथा जाधव, दिपक चौधरी, अॅड. जावेद भाई, शेख अजिम, गणेष सपकाळ, शेषराव साळवे, यांच्यासह सह अनेक कार्यकर्त्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

You Might Also Like

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Government Yojana: थेट गावातच मिळणार शासकीय योजनांचा लाभ

Hivtap Blood Test: हिवताप रक्त तपासणीत १३ नमुने दुषित

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

Washim : मानोरा तालुक्यात पंधरा गावांमध्ये “भारत कृषि जागरण यात्रा” अंतर्गत शेतीत आधुनिक तंत्रज्ञान प्रसार व जनजागृती !

TAGGED: MLA Rahul Bondre
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News

Hingoli: दिवाळीच्या तोंडावर घरफोडी; इतक्या लाखांची रक्कम पळविली

Deshonnati Digital Deshonnati Digital October 29, 2024
MahaKumbh 2025: नागपूरकरांना मिळणार पवित्र कुंभस्नानाची अनुभूती
Sindkhedaraja Assembly Election: सिं.राजा: महायुतीकडून आले पुढे आता अनेक दावेदार!
Dam victims Andolan: अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ८ ऑक्टोंबरला धरणग्रस्तांचे आंदोलन
Gadchiroli : वृत्तपत्र वाटणार्‍या ‘अंश’ने दहावीत प्राप्त केले ९०.६० टक्के गुण; जिद्द, चिकाटी आली फळाला
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Chandrasekhar Bawankule
विदर्भअमरावतीमहाराष्ट्रराजकारण

Chandrasekhar Bawankule: शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी समिती स्थापन करणार- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

June 13, 2025
Pickup Accident
विदर्भगोंदिया

Government Yojana: थेट गावातच मिळणार शासकीय योजनांचा लाभ

June 13, 2025
Hivtap Blood Test
विदर्भआरोग्यगोंदिया

Hivtap Blood Test: हिवताप रक्त तपासणीत १३ नमुने दुषित

June 13, 2025
CM Devendra Fadnavis
Breaking Newsनागपूरबिझनेसमहाराष्ट्रमुंबई

CM Devendra Fadnavis: आता नागपूरमध्ये उभारणार हेलिकॉप्टर निर्मिती कारखाना!

June 13, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?