प्रत्येक आगारासाठी १०० अद्यावत बस उपलब्ध करुन द्या
परभणी/सोनपेठ () : परभणी जिल्ह्यातील पाथरी, परभणी, गंगाखेड, सेलु, जिंतूर यांसह सर्वच आगारांना नविन अद्यावत १०० बस उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar) यांनी मुंबई येथे राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, सेलु, जिंतूर, परभणी यांसह अन्य आगारातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बस गाड्यांची अवस्था खराब झाली आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच मार्गावर ना दुरुस्त बस धावत असल्याने रस्त्यामध्ये अचानक बस बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते आशा वेळी प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते आहे.
बसगाड्या सुव्यवस्थित नसल्यामुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांची व शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय सोय होत आहे. पावसळ्यात गळक्या बस धावत असल्याने प्रवाशांना जिव मुठीत धरून प्रवाश करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये एस.टी. विभगविषयी संतापाची भावना आहे. या अडचणी लक्षात घेऊन परभणी जिल्ह्यातील सर्वच आगारासाठी १०० नविन अद्यावत बस देण्यात याव्यात अशी मागणी आ. राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar) यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.