विधीमंडळ अधिवेशनात पुरवणी मागणी
परभणी/मानवत (MLA Rajesh Vitekar) : राज्य विधिमंडळ अधिवेशनात पाथरी विधानसभेचे आ. राजेश विटेकर यांनी औचित्याच्या मुद्यावर मानवत शहरातील विविध विकासकामांसाठी आग्रही मागणी केली. नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे अधिवेशन चालू असून २० डिसेंबर रोजी औचीत्याच्या मुद्यावर पुरवणी मागणी करताना आ. राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar) यांनी मानवत शहराच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामासाठी शासनाचे लक्ष वेधले. पाथरी विधानसभा मतदारसंघातील मानवत हे शहर राष्ट्रीय महामार्ग ६१ वर वसले असल्याकारणाने या रस्त्यावर फार मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
रुग्णावर उपचार करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येते. परंतु ग्रामीण रुग्णालयाची यंत्रणा ही अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी परभणी येथे जावे लागते. अनेकदा वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे मानवत येथील ग्रामीण रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर मंजूर करण्यात यावे. मानवत शहरातील पुढील पंचवीस वर्षातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता दरडोई १३५ लि. पाणी मिळावे यासाठी वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात यावी. शहर व तालुक्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी बहुउद्देशीय नाट्यगृह, व्यापारवाढीच्या दृष्टीकोनातून व्यापारी संकुल उभारणे, क्रीडा संकुल, भाजी मार्केट ची अनेक दिवसापासूनची मागणी आहे.
शहरातील वाढत्या लोकसंख्येनुसार हिंदू स्मशान भूमी, बौद्ध स्मशानभूमी व मुस्लिम कब्रस्तान मध्ये जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा विस्तार व सुशोभीकरण करण्यासाठीही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा हे देखील मागणी त्यांनी यावेळी मांडली. शहर स्वच्छतेसाठी भूमिगत गटार योजना आवश्यक आहे. यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी विधानसभेत करण्यात आली. एकूणच सध्याच्या राजेश विटेकर (MLA Rajesh Vitekar) यांच्या कार्यप्रणालीमुळे मानवत शहरासह संपूर्ण मतदारसंघातील मतदार अत्यंत प्रभावीत झाले असून अशाच प्रकारे त्यांनी कामे केल्यास पाथरी मतदारसंघात कोणतेही काम शिल्लक राहणार नाही असे बोलले जात आहे.
नगरपालिका सरसावली १३५ लिटर पाणी प्रतिमानस देण्यासाठी
एकीकडे विधानसभेत राजेश विटेकरांनी प्रतिमाणूस १३५ लिटर पाणी देण्याकरिता मागणी केली आणि दुसरीकडे नगरपालिका युवा नेते डॉ. अंकुश लाड यासाठी सरसावले असून त्यांनी या मागणीला पूरक असे निम्न लोअर दुधना प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यासाठी तात्काळ प्रस्ताव दाखल करत १३५ लिटर प्रतिमानुस पाणीपुरवठा चा प्रस्ताव मुंबईकडे रवाना करण्यासाठी प्रशासकीय कारवाई सुरू केली आहे.
आमदार विटेकरांच्या खांद्याला खांदा लावून मानवत शहराचा सर्वांगीण विकास करू – डॉ. अंकुश लाड
मानवत शहर हे नेहमीच महायुतीच्या खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहे. यापूर्वी देखील झालेल्या निवडणुकांमध्ये मानवत शहरवासीयांनी भरपूर मतदान हे महायुतीच्या झोळीत टाकले आहे. आता या मताची परतफेड म्हणून महायुतीचे आ. राजेश विटेकर यांच्या खांद्याला खांदा लावून मानवत शहरवासीयांसाठी मानवत शहरांचा सर्वांगीण विकास करू असे यावेळी नगरपालिकेचे युवा नेते डॉ. अंकुश लाड यांनी सांगितले.