आमदार राजू पाटील नवघरे यांचे रुग्णालय प्रशासनाला आवाहन
वसमत उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस मशीनची लोकार्पण
वसमत (MLA Raju Patil Navghare) : वसमत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस मशीन कार्यान्वित झाली आहे या यंत्रणेचा किडनी रुग्णांना योग्य पद्धतीने लाभ व्हावा 24 तास सेवा मिळावी व रुग्णांना या यंत्रणेचा मोफत लाभ मिळवून देण्यासाठी डॉक्टरांनी व प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांनी केले. गुरुवारी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिस मशीनचे लोकार्पण पार पडले यावेळी मार्गदर्शन करत होते.
वसमत येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी डायलिसिस मशीन बसवण्यासाठी आमदार राजू पाटील नवघरे यांनी पुढाकार घेतला वसमत येथेच मोफत डायलेसिसची सेवा देऊन किडनी रोगाने ग्रस्त रुग्णांना दिलासा देण्याचा त्यांनी संकल्प केला होता तो आता पूर्णत्वास आला आहे रुग्णालयात आठ मशीन प्राप्त झाले आहेत.
किडनीग्रस्त रुग्णांना मोफत डायलिसिसची सोय व्हावी म्हणून उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सुविधा कार्यरत करण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे उपजिल्हा रुग्णालयात आठ मशीन उपलब्ध झाले आहेत गुरुवारी उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्रणेचा लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी आमदार राजू पाटील नवघरे, नगराध्यक्ष सुनिता मनमोहन बाहेती, कन्हैया बाहेती, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गंगाधर काळे, शिवराज कदम, सचिन दगडू, मुजीब पठाण, संकेत नामपल्ली,त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वनगरसेवक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांनी रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून रुग्णांना सेवा द्या वसमत उपजिल्हा रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरेल अशा पद्धतीने कामकाज आले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली डायलेसिस सेंटरचा लाभ वसमतच्या रुग्णांना व्हावा व त्यांची अडचण दूर व्हावी यासाठी प्रयत्न केले व त्यास यश आले असल्याच्या भावना यावेळी व्यक्त केले.
या संदर्भात आमदार राजू पाटील नवघरे (MLA Raju Patil Navghare) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की डायलिसिस साठी रुग्णांना नांदेडला जावे लागते मोठा खर्च येतो सामान्य व गोरगरीब घरातील कुटुंबीयांची ही अडचण पाहून आपण डायलिसिस सेंटर मंजूर करून घेतले आहे वसमत जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटर कार्यान्वित झाले आहे किडनी आजाराने ग्रस्त रुग्णांना मोफत स्वरूपात वसमत येथेच डायलेसिस व्यवस्था मोफत उपलब्ध होणार आहेत या यंत्रणेचा रुग्णांना शंभर टक्के लाभ व्हावा रुग्णांना सुविधा व्हावी यासाठीच्या सूचना उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणा दिले असल्याची माहिती आमदार राजू पाटील नवघरे यांनी देशोन्नतीशी बोलताना दिली.




