गरजू नागरिकांनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन!
मानोरा (MLA Saitai Dahake) : तालुक्यातील मौजे गिरोली येथे कारंजा – मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार सईताई प्रकाशदादा डहाके (MLA Saitai Dahake) यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन भारतीय जनता पार्टी मानोरा तालुक्याच्यावतीने करण्यात आले आहे. तरी या शिबिराचा गरजू नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपा डॉक्टर असोशिएसनचे जिल्हाध्यक्ष डॉ अविनाश लोथे यांनी केले आहे.
कारंजा मानोरा विधानसभेच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार सईताई डहाके (MLA Saitai Dahake) यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज गुरुवारला मौजे गिरोली येथे डॉक्टर अविनाश लोथे यांच्या दवाखान्यात मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन भाजपा पार्टी मानोरा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे. तपासणी व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असुन नेत्रतज्ञ डॉक्टर शिबिरात सेवा देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत.
तरी सर्व गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे भाजपा पदाधिकारी डॉ अविनाश लोथे, बाजार समितीचे माजी उपसभापती तथा भाजपा पदाधिकारी देवनाथ भोयर, भाजपा तालुका सरचिटणीस प्रविण धोटे, भाजपा तालुका उपाध्यक्ष संजय गावंडे, भाजपा पदाधिकारी तथा युवा उद्योगपती पंडीत जाधव यांनी केले आहे.




