भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप तांदळे यांचा विश्वास
निलंगा (MLA Sambhajirao Patil Nilangekar) : संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी निलंगा मतदार संघात मोठा विकास निधी खेचून आणला आहे विकासाची परंपरा कायम ठेवण्यासाठी पुन्हा एकदा त्यांनाच मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार भाजपा ओबीसी मोर्चाने व्यक्त केला असल्याचे प्रदेश सरचिटणीस प्रदीप तांदळे यांनी रविवारी ता. २० रोजी बैठकीत केला.
माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील (MLA Sambhajirao Patil Nilangekar) निलंगेकर साहेब यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहीती बैठकीत समजताच ओबीसी बांधवांकडून आनंद व्यक्त करण्यात आला. यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर, माजी सभापती गोविंद चिलगुरे, संजय दोरवे, आप्पाराव नाटकरे यांच्यासह आदीची उपस्थिती होती. तांदळे म्हणाले की, केंद्रीय नेतृत्वांकडून संभाजी पाटील निलंगेकर यांना निलंगा विधानसभेसाठी पहील्याच यादीमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची आनंदाची बातमी आहे. सर्वां संघटनात्मक कामाची चर्चा सुरु असतानाच विकासाचा मुद्दा घेऊन संघटनेसाठी झटणाऱ्या आपल्या नेत्याला संधी देण्याचा निर्णय संघटनेनेच घेतला.
संपूर्ण ओबीसी समाज भाजपासोबत असून जनमाणसांच्या न्याय हक्कासाठी व एक व्यापक कार्य यातून घडविण्याचा प्रयत्न असून मतदार संघात त्यांनी प्रत्येक वाडी, वस्ती, तांड्यापर्यत विकास निधी पोंहचवला आहे. तेव्हा येत्या निवडणुकीत विक्रमी मतांनी त्यांचा विजय होणार आहे. असेही (MLA Sambhajirao Patil Nilangekar) त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बस्वराज पाटील, तालुका अध्यक्ष गोविंद पोतदार, सं.गा.यो. अध्यक्ष शेषराव ममाळे, तांडा वस्ती सुधार योजनेचे अध्यक्ष सुरेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य धोडीराम बिराजदार, शहराध्यक्ष विरभद्र स्वामी, प्रकाश कोरे, तुकाराम काळे, ब्रहमा भोसले, सुभाष म्हेत्रे, सत्यकलाताई मंदुमले, नामदेव पाटील आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.