हिंगणा (MLA Sameer Meghe) : सामाजिक ऐक्य, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी झटणारे महानत्यागी बाबा जुमदेवजी यांच्या विचारांवर कार्य करणाऱ्या परमात्मा एक सेवक (Paramatma Ek Sevak) सदस्यांचा मेळावा कोतेवाडा (गुमगाव) येथे घेण्यात आला. हिंगणा मतदार संघातील भाजप महायुतीचे उमेदवार आ. समीर मेघे (MLA Sameer Meghe) हे निःपक्षपणे समाजसेवेचे, आरोग्यसेवेचे कार्य करीत असल्याने त्यांच्या पाठीशी परमात्मा एक सेवक परिवारातील सर्व सदस्य एकजुटीने उभे राहतील व त्यांच्यासाठी प्रचारकार्य करतील, असा निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
या (Paramatma Ek Sevak) मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सेवक हरिभाऊ आष्टणकर होते. यावेळी, प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्त्या स्मिता मेघे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनराज आष्टणकर, वडगावचे माजी सरपंच अक्षय लोढे, सेविका यशोदा निमजे, नंदू झाडे, उमेश निमजे, रोशन गंधारे, गणपत दुर्गे, राहुल निखार, करण झाडे, निखिल बेले, सचिन दुर्गे, घनश्याम गगाटे, संगीता आष्टणकर, वनमाला झाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. आपला भाऊ समीर स्वतःच्या परिवारापेक्षाही तो आपला जास्तीतजास्त वेळ हिंगणा क्षेत्रातील सर्व कुटुंबांना देतो हे सर्वांनाच माहिती आहे. तो सर्वसामान्यांसाठी धावून जातो व दिलेला शब्द पाळतो, असे प्रतिपादन स्मिता मेघे (Smita Meghe) यांनी या मेळाव्यात केले. मेळाव्याला परमात्मा एक सेवक या संघटनेचे परिसरातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.