हिंगणा (MLA Sameer Meghe) : भाजपचे स्टार प्रचारक, सिनेअभिनेते खासदार रविकिशन (MP Ravikishan) यांनी हिंगणा विधानसभा क्षेत्रातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचारयात्रा व जाहीर सभेला परिसरातील नागरिकांनी अलोट गर्दी केली. या सभांपूर्वी हिंगणा क्षेत्रातील डिगडोह, नीलडोह, अमरनगर, राजीवनगर, एकात्मता नगर, इंदिरामाता नगर, वैशाली नगर या भागात आयोजित रॅलीत खा. रविकिशन सहभागी झाले होते.
याशिवाय, सायंकाळी डिगडोह व राजीवनगर येथे आयोजित समीर मेघे (MLA Sameer Meghe) यांच्या प्रचार सभेत सहभागी होऊन त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. आमदार समीर मेघे कोणाहीबद्दल भेदभाव करीत नसून संपूर्ण समाजाने एकजूट होऊन सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहनही खा. रवीकिशन (MP Ravikishan) यांनी केले.