बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : 2019 ची विधानसभा निवडणूक लढण्यापूर्वी, संजय गायकवाड रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्याचरणी लीन झाले होते. अनेक नेते वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रावर जातात, पण धर्मवीर संजूभाऊंचे तीर्थक्षेत्र म्हणजे रायगड. आताही त्यांनी 2024 च्या निवडणुकीआधी दसरा मेळावा आटोपून थेट गाठले ते रायगड, याच रायगडावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन फुंकला तो, दुसऱ्या विधानसभा निवडणुकीच्या लढईसाठी शंखनाद !
छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतल्यावर त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओ पोस्ट मधून नमूद केले आहे की- “मागच्यावेळी पवित्र रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झालं. मी विधानसभा लढणार आहे, अशी त्यावेळी घोषणा केली होती आणि विधानसभा लढलो सर्व जनता-जनार्दनाच्या आशीर्वादाने विजयी सुद्धा झालो. पाच वर्षांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर मार्गक्रमण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.
अठरापगड जातीतील सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन शाश्वत विकास साधण्याचा प्रयत्न केला, आणि शिवरायांच्या व आई भवानीच्या कृपेने मला प्रचंड यश या कामामध्ये आलं. माझ्या जिल्ह्यातील मी जातीयवाद संपवला. मी मानवता म्हणून याठिकाणी सर्व जाती-धर्माच्या लोकांना एका माळेमध्ये गुंफवण्याचा प्रयत्न केला. सर्व दैवते उभी करण्याचा प्रयत्न केला, सर्वांची स्मारके उभे करण्याचा प्रयत्न केला. जगातील सर्वात मोठे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक देखील मी उभं केलं. राजमाता जिजाऊ साहेब, छत्रपती संभाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद.. जेवढे जेवढे काही शिवाजी महाराजांच्या सोबत वीर सरदार होते, त्या सर्वांना देखील सन्मानाचे स्थान आपल्या शहरामध्ये दिलं.
पुढच्या लढाईला सज्ज होण्याकरीता शिवरायांचे आशीर्वाद घेण्याकरिता मी पुन्हा रायगडाच्या आणि शिवरायांच्या चरणी आलेलो आहे आणि आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हाच आदर्श, हेच विचार घेऊन पुढच्या पाच वर्षांमध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये वाटचाल करून हजार तरुणांना, नोकरीच्या, व्यवसायाच्या माध्यमातून, उद्योगाच्या माध्यमातून आणि सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून मी काम करणार आहे. त्या उद्देशानेच मी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. निश्चितपणे मला खात्री आहे की, सर्व शिवभक्त जनता-जनार्दन माझ्या स्वभावाचा आणि माझ्या कामाचा विचार करतील आणि सहज माझ्या पाठीशी ठाम उभे राहतील.. आणि दूर-दूर सुद्धा कोण्या विरोधकाला थारा देणार नाहीत, हा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद..!”
आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची ही व्हिडिओ पोस्ट, ठरली आहे त्यांनी रायगडावर जाऊन फुंकलेल्या दुसऱ्या लढाईसाठीचा शंखनाद !