आ. गायकवाड यांच्या माध्यमातून मॅरेथॉन बैठकांचे सत्र
बुलडाणा (MLA Sanjay Gaikwad) : मातृतीर्थ बुलढाणा शहरात छत्रपती शिवरायांचा जगातील सर्वात उंच अश्वारूढ असलेल्या पुतळ्यासह 26 महापुरुषांच्या पुतळ्यांचे अर्थात भव्य स्मारकांची लोकार्पण गुरुवार 19 सप्टेंबर रोजी होणार असून, त्यासाठी आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या माध्यमातून मॅरेथॉन बैठकांची सत्र सुरू असून तयारीला प्रचंड वेग आला आहे. भव्य स्मारकांचे लोकार्पण सोहळा हा लोकोत्सव व्हावा, अशा भावना आ. गायकवाड व्यक्त करत असून हजारोंच्या संख्येनी या सुवर्णक्षणांचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करत आहे.
बुलढाणा शहरात गुरुवार 19 सप्टेंबर रोजी (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार (Ajit Pawar), शिवरायांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले, युवराज संभाजी राजे ,छत्रपती बाबाजी राजे, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव व ना. रक्षाताई खडसे, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार व पालकमंत्री दिलीप वळसे पाटील या मान्यवरांच्या हस्ते भव्य स्मारकाचे लोकार्पण होणार असून आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहतील. तर जिल्ह्यातील सर्व आमदार यावेळी सन्माननीय प्रमुख उपस्थितीमध्ये असतील. हा सोहळा बुलढाणा नगरपालिकेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला आहे.
स्मारकाच स्मारकांच्या भव्य लोकार्पणामध्ये राजमाता जिजाऊ व बाल शिवाजी स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले स्मारक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक, छत्रपती शाहू महाराज स्मारक, वामनदादा कर्डक स्मारक, संत रविदास महाराज, नरवीर बाजीप्रभू देशपांडे स्मारक, अग्रसेन महाराज स्मारक, भगवान महावीर जैन स्मारक, महात्मा बसवेश्वर स्मारक, नरवीर तानाजी मालुसरे स्मारक, शिवरत्न शिवा काशीद स्मारक, भगवान वीर एकलव्य महाराज स्मारक, महर्षी वाल्मिकी ऋषी स्मारक, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक, शहीद जवान युद्धस्मारक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, माझी वसुंधरा स्मारक, महाराष्ट्रातील पहिले छत्रपती शिवाजी महाराज मंदिर, बळीराजा स्मारक, वसंतराव नाईक स्मारक, सरदार वल्लभभाई पटेल स्मारक, बाळासाहेब ठाकरे स्मारक, संत सेवालाल महाराज स्मारक चक्रवर्ती सम्राट अशोक स्मारक, संत गाडगे महाराज स्मारक, हिंदूसूर्य महाराणा प्रताप स्मारक, राष्ट्रसंत भगवान बाबा स्मारक.. आदी विविध स्मारकांसह काही भवन व प्रवेशद्वारांचे लोकार्पण यावेळी होणार आहे.
यासाठी आ. संजय गायकवाड यांच्या माध्यमातून मॅरेथॉन बैठकांचे आयोजन सुरू आहे. प्रत्येक स्मारक समितीला विश्वासात घेऊन सूक्ष्म नियोजन सुरू आहे. जास्तीत जास्त लोकांनी या लोकसभा सामील होण्याचे आवाहन आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केले आहे.