आ. संजुभाऊंचा सभागृहात आक्रमक पवित्रा!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान (Buldhana Assembly) बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सभागृहात शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत अमरावती विभागातील भूजल पातळी आणि GSDA (Groundwater Survey and Development Agency) च्या जाचक अटींवर शासनाला धारेवर धरले.
शेतकऱ्यांना विहिरी मंजूर होत नाहीत, पण समूहगटासाठी अटी शिथिल?
GSDA च्या 2011-12 च्या सर्वेनुसार, अमरावती विभागात भूजल पातळी 1000 फूटांच्या खाली गेली आहे. यामुळे (Buldhana Assembly) शासनाच्या कोणत्याही योजना त्या भागात लागू करता येत नाहीत, मात्र समूहगटाच्या विहिरींसाठी ही अट लागू होत नाही. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, असे (MLA Sanjay) Gaikwad गायकवाड यांनी अधोरेखित केले. या गंभीर प्रश्नावर उत्तर देताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी कोणतेही स्पष्टीकरण न देता जीएसडीएची अट काढता येणार नाही, असे सांगितले. यामुळे सभागृहात मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या हितासाठी लढाई सुरूच राहील
सभागृहात शेतकऱ्यांचा मुद्दा असंवेदनशीलपणे फेटाळला गेला, यावर संतप्त प्रतिक्रिया देताना आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. GSDA ची ही अट रद्द होईपर्यंत लढा सुरूच राहील!” शेतकऱ्यांना दिलासा मिळणार का? GSDA च्या जाचक अटी शिथिल होतील का? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. यावर आता राज्य सरकार पुढील काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.