धर्मवीर संजुभाऊंसाठी लाडक्या बहिणी मैदानात
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : शहरातील नव्हेतर बुलढाणा मतदार संघातील माता-भगिनींसाठी संरक्षण कवच म्हणून धर्मवीर आ. संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची ओळख आहे. गत ४० वर्षापासून माता- भगिनींसाठी त्यांनी केलेले काम सर्वशृतच आहे. त्यामुळे जिथे कुठे प्रचार रॅल्या आयोजीत केल्या जातात, तिथे न बोलविता शेकडो माता- भगिनी त्यांच्या उत्स्पूâर्तपणे सहभागी होतात. विशेष म्हणजे त्यांची रॅली ज्या भागातून जाते, त्या भागात सडा टावूâन रांगोळी काढत त्यांचे औक्षण केल्या जाते. एवढेच नाहीतर त्यांच्या- करीता प्रचारात उतरलेले त्यांचे सुपूत्र तथा युवा सेनेचे नेते मृत्यूंजय गायकवाड व त्यांच्या पत्नी तथा माजी नगराध्यक्षा सौ. पूजाताई संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचेही स्वागत तेवढ्याच भावनिक पध्दतीने व दिमाखात होत असल्याचे दिसते.
बुलढाणा शहरातील जुनागाव परिसरात प्राचीन श्री हनुमान मंदिरातून धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅलीचा शुभारंभ झाला तेंव्हा असंख्य लाडक्या बहिणींची तसेच माता भगिनींची लक्षणीय उपस्थिती होती. आमच्या लाडक्या भावाला पुन्हा एकदा नव्या जोमाने आणि जास्तीत-जास्त मताधिक्याने विधानसभेत पाठवणार असल्याचा निर्धार उपस्थित महिला मंडळींनी केला. ८ नोव्हेंबर रोजी निघालेल्य या रॅलीत शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच मित्रपक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी त्या प्रचार रॅलीमध्ये लहानापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांचा उत्साह पाहण्यासारखा होता, आमच्या लाडक्या भावाला, बुलडाण्याच्या ढाण्या वाघाला पुन्हा एकदा मताधिक्याने विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी केला. बुलडाणा शहरातील राजे छत्रपती श्री संभाजी नगरमध्येही भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती, तिलाही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
९ नोव्हेंबर रोजी बुलढाणा शहरातील राजे संभाजीनगर परिसरातील पेठेतील श्रीराम मंदिरामध्ये प्रभू श्रीरामाची तसेच हनुमंताचे पूजन करून धर्मवीर आ. संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्याहस्ते अभूतपूर्व प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली. यावेळी राजे संभाजीनगर व क्रांतीनगर, तेलगू नगर, पाठक गल्ली,शिवनेरी नगर तसेच संपूर्ण परिसरांमधून प्रचार रॅलीला माता-भगिनींनी तसेच नागरिकांनी पुष्पांचा वर्षाव करीत उत्स्पूâर्त प्रतिसाद दिला. प्रभाग क्रमांक- २ /३ /४ भीम नगर, परदेसी पुरा,मिर्झा नगर ईकबाल नगर, जोहर नगर परिसरामध्ये आ. संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या प्रचारार्थ असंख्य माता-भगिनींच्या तसेच नागरिकांच्या उपस्थितीमध्ये भव्य प्रचार रॅली संपन्न झाली.या रॅलीदरम्यान नागरिक व माता-भगिनींनी फुलांच्या वर्षावात, फटाक्यांच्या आतषबाजीत उत्स्पूâर्त स्वागत केले.
माता-भगिनींचा सन्मान हाच संजुभाऊंसाठी खरा स्वाभिमान: पूजाताई गायकवाड
माता-भगिनींनी केवळ चूल अन् मूल एवढ्यापुरते सिमीत न राहता कर्तृत्वाच्या आकाशात भरारी घ्यावी, यासाठी संजुभाऊ (MLA Sanjay Gaikwad) कायम आग्रही व प्रयत्नशील असतात. त्यांनी ही सुरुवात आधी घरातून केली, ते नगराध्यक्ष न बनता त्यांनी महिला असतांनाही मला नगराध्यक्षा बनविले. घरात आलेल्या दोन्ही सुनांना ते मुलीसारखी वागणूक देतात. मृत्यूंजयला पहिली मुलगी झाली तेंव्हा तिचे नाव त्यांनीच ठेवले, धर्मवीरा. ते कितीही रात्री उशीरा घरी येवोत, नातीशिवाय जेवण करत नाही. त्यांच्या संपर्कात येणाNया प्रत्येक महिलेला ते बहिणीसारखा सन्मान देवून, तिला योग्यच सल्ला देतात. शेकडो पळून गेलेल्या मुली त्यांनी परत आणल्या आहेत. त्यामुळे आज कुठलीही महिला-भगिनी त्यांच्याकडे कोणतेही काम घेवून येऊ शकते. हजारो तुटू पाहणारे संसार त्यांनी जुळून ठेवले आहेत. प्रत्येक माता-भगिनींचा सन्मान हाच आपल्यासाठी स्वाभिमान असल्याचे ते म्हणतात, असे पूजाताई म्हणाल्या.