शहर हद्दवाढ, टेक्स्टाईल पार्क, फूड पार्क, हरमोड धरणाची उंची वाढविणे व मलकापूर ते सोलापूर बायपास विषयाला मान्यता!
बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : बुलढाणा विधानसभा (Buldhana Assembly) मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या प्रयत्नाने बुलढाणा येथील विविध लोकहिताचे कामे तातडीने मार्गी लावण्याची आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज बुधवार 23 जुलै रोजी दिले. यात प्रामुख्याने मतदार संघातील ड्रीम प्रोजेक्ट असलेले मोताळा येथील टेक्सटाईल पार्क, बुलढाणा येथील फूड पार्कसह हरमोड धरणाची उंची वाढविणे, गिरडा ते कोलवड येथे 17 बांध तयार करणे, मलकापूर ते सोलापूर 72 किलोमीटरचा रस्ता, राजूर घाटातील एकेरी वाहतूक आदी विषयास अंतिम मान्यता देण्यात आली.
याविषयी सह्याद्री अतिथि गृहात विविध विकासाच्या मुद्द्यांना चालना देण्यासाठी सर्व प्रधान सचिव व मुख्याधिकाऱ्यांच्या बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पलढग धरणाचे ओव्हर प्लो चे 60 टक्के पाणी कोथळी मार्ग नळगंगा धरणात वळती करणे व सांडव्यामध्ये बांध बांधून लिफ्ट मार्ग 40% पाणी धामणगाव देशमुखच्या धरणात नेणे.. या विषयास मंजूर देण्यात आली. सदर विषयामुळे जवळपास 1200 एकर जमिनीचे सिंचन वाढणार आहे तसेच नळगंगा धरणाचे स्टोअरेज वाढणार आहे. (Buldhana Assembly) बुलढाणा तालुक्यातील गिरडा स्टोरेज डॅम साठवण तलाव, गिरडा ते कोलवड नदीवर जवळपास 17 बांध निर्मितीस मान्यता देण्यात आली. नळगंगा हे मोताळा तालुक्यात आहे, या पाण्याचा फायदा मात्र पुढच्या लोकांना होत होता. परिणामी मोताळा तालुक्यातील जनमानसात नाराजी होती. “धरण उशाला, कोरड घशाला” अशी परिस्थिती असल्याने सभोवतालच्या लोकांना पाण्याचा लाभ होत नव्हता.
परिसरातील नागरिकांनी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची भेट घेऊन सदर विषय मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने आ. गायकवाड यांनी सदर विषय मुख्यमंत्र्यांच्या (CM Eknath Shinde) निदर्शनास आणून दिला. मोताळा तालुक्यातील किन्होळा शिवारामध्ये शासनाचे ई क्लास 185 हेक्टर जागेवर नळगंगा धरणातून पाणी लिफ्ट करून साठवून तलावाची निर्मिती करण्याच्या प्रस्तावाला देखील मान्य देण्यात आली. त्यामुळे धामणगाव बढे, हनवतखेड व जवळच्या 17 गावांच्या शेतीच्या सिंचनाचा प्रश्न कायमचा संपणार आहे. उबाळखेड व मोहाडी शिवारात नवीन धरणाच्या निर्मितीस मान्यता देण्यात आली. यासोबतच मलकापूर ते सोलापूर नॅशनल हायवे क्रमांक 53 हा रस्ता 72 किमीचा बुलढाणा ते चिखली रस्ता बायपास करून बुलढाणा शहराच्या बाह्य वळण रस्ता व राजुर घाटातील एकेरी वाहतुकीसह चार पदरी रस्त्यास अंतिम मान्यता देण्यात आली. मोताळा तालुक्यातील टेक्सटाईल पार्क व बुलढाणा तालुक्यातील फूड पार्क या ड्रीम प्रोजेक्टला शासनाने मान्यता दिल्याने लवकरच विधानसभे अंतर्गत अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
यासह बुलढाणा शहरातील(Buldhana Assembly) स्टेट बँक समोरील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पडीक जागेत 60 टक्के जागा उद्यान व चौपाटी करिता मान्यता देण्यात आली. चिखली रोडवरील त्रिशरण चौकातील शासकीय अध्यापक महाविद्यालयाची अडीच एकर जागा नगरपालिकेची इमारतकरीता देण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. भूविकास बँकेची 20 गुंठे जागा नगर पालिकेला छत्रपती शिवाजी महाराज शॉपिंग कॉम्प्लेक्स व सभागृह करीता देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्याचप्रमाणे मोताळा तालुक्यातील टेक्सटाईल पार्क व बुलढाणा येळगाव धरणाखाली 14 एकर जागा फूड पार्कला देण्याबाबतच्या वापरात बदलाच्या आदेशालाही संमती देण्यात आले. 1995 पासून नगर पालिकेच्या हद्द वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पडून होता, 2004 ग्राम विकास विभागाच्या एका शासन निर्णयामुळे ही हद्द वाढ करणे शक्य नाही.असे महाराष्ट्र निवडणूक बायकोच्या वतीने सांगण्यात आले होते. शासन निर्णयाची अट येत्या आठ दिवसात शिथिल करण्याचे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधित विभागाला दिले.
सदरची बैठक (Buldhana Assembly) बुलढाणाचे आमदार धर्मवीर संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांच्या विनंतीवरून बोलावण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री, सहकार मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आ. संजय गायकवाड, आ. श्वेताताई महाले, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुपकुमार, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव गणेश पाटील सर्व विभागाचे मुख्याभियंता सर्व चीफ इंजिनियर अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता उपस्थित होते. त्या सर्वांसमोर आमदार संजय गायकवाड यांनी 15 विषयात प्रभावीपणे मांडणी केली, त्यावर मान्यता देण्यात आली.
आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) हे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील लोकहिताची विविध कामे अतिशय वेगाने मार्गी लावण्याचा सपाटा सुरू केला आहे, लवकरच आचारसंहिता जाहीर होण्याची चिन्हे आहेत त्या पार्श्वभूमीवर आमदार संजय गायकवाड हे दिवस-रात्र परिश्रम करीत असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सातत्याने संपर्कात आहे. मतदार संघातील विविध विकासकामे यांची माहिती देऊन कामे मंजूर करून घेत आहेत. नुकतेच त्यांनी बुलढाणा विधानसभेतील मोताळा येथील ड्रीम प्रोजेक्ट असलेले टेक्सटाईल पार्क तसेच (Buldhana Assembly) बुलढाणा येथील फूड पार्क या प्रोजेक्टला शासनाची मान्यता मिळून घेतली आहे या दोन्ही प्रोजेक्टमुळे जिल्हाभरातील हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे, तसेच लघु व्यवसायिकांची सुद्धा चांगली दिवस येणार आहेत.