बुलढाणा (MLA Sanjay Gaikwad) : जिल्ह्यात तसेच आपल्या बुलढाणा विधानसभा मतदार संघात (Buldhana Assembly Constituency) गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून, नद्या-नाल्यांना पूर आला आहे. छोटे-मोठे तलाव धरणे भरले आहेत. सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या पिकांना शंभर टक्के फटका बसला आहे. यातील काही भागांची प्रत्यक्ष पाहणी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी केली असून बुलढाणा व मोताळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करण्यात यावे, असा सूचनावजा आदेश दोन्ही तहसीलदारांना दिले आहेत.
तसेच कृषी सहाय्यक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी देखील शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करावे व अहवाल शासनास सादर करावा आपण शासन स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळून देऊ, अशी आश्वासनही यावेळी आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी दिले आहे.