बुलढाणा : महायुतीच्या पदाधिकार्यांकडून चाललेल्या प्रचारालाही जनसमर्थन!
बुलढाणा () : संजूभाऊ जे काय बोलतात ते वरच्या राजकारण्यांवर, स्थानिक पातळीवर ते न बोलता फक्त काम करत राहतात. ७० वर्षाची जेवढी विकासकामे झाली नसतील, तेवढी विकास कामे अवघ्या अडीच वर्षात करून एक रेकॉर्ड संजूभाऊंनी केला आहे. कामांमुळे त्यांची तयार झालेली लोकप्रियता पाहून, सुशिक्षित बनवणारे विरोधक खालच्या पातळीवर त्यांच्यावर घसरत आहे. जे दिल्लीत काम केल्याचे सांगतात त्यांची गल्लीछाप भाषा पाहून, त्यांचा स्तर काय ? हे आता जनतेनेच ओळखले आहे. (MLA Sanjay Gaikwad) संजूभाऊंच्या कामांचा प्रभाव संपूर्ण बुलढाणा विधानसभा मतदारसंघात असून, त्यांचे कार्य जनहितासाठी समर्पित असल्याच्या भावना महायुतीचे पदाधिकारी विविध प्रचार फेर्यांच्या माध्यमातून व्यक्त करत आहे. विशेष म्हणजे ज्या-ज्या भागात प्रचार रॅली जाते, त्या-त्या भागातील महिला-भगिनी सडा टाकून रांगोळी काढत स्वागत करतात व औक्षवण करून पदाधिकार्यांचा सन्मान करतात. त्यामुळे महायुतीकडून चाललेल्या प्रचाराला मिळत असलेले जन समर्थन प्रामुख्याने दिसते!
संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांचे काम हे केवळ राजकारणापुरते व सत्तेपुरते मर्यादित नसून, ते समाजसेवेला अग्रक्रम देतात. विकासाची पायाभरणी करण्यापासून ते गरिबांपर्यंत सरकारी योजना पोहोचविण्यापर्यंत, त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये योगदान दिले आहे. त्यांची कार्यशैली जनतेला नेहमीच समाधानकारक वाटली आहे, आणि त्यामुळेच ते बुलढाण्यात लोकप्रिय आहेत. विरोधकांचा आरोप केवळ राजकीय फायद्यासाठी आहे. हे स्पष्ट आहे की, जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नाही, त्यामुळे त्यांनी आरोपांचा आधार घेतल्या जात आहे, असे महायुतीचे पदाधिकारी सांगत असून.. मात्र बुलढाण्याची जनता संजूभाऊ गायकवाड यांच्या प्रत्यक्ष कामांवर विश्वास ठेवते, ही ग्वाही व्यक्त केल्या जात आहे. संजूभाऊंनी रस्ते, पाणी आणि वीज यासारख्या आवश्यक गरजांची पूर्तता केली आहे. त्यांच्या कार्यातून दिसून येते की ते निवडणुकीपुरते नाहीत, तर जनतेच्या सेवेसाठी सदैव अविरत तत्पर असल्याचे विविध प्रचार सभामधून सांगितले जात आहे.
त्यामुळे या निवडणुकीत बुलढाण्यातील जनतेने अनुभवी, सक्षम आणि समर्पित नेतृत्व म्हणून संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनाच पुन्हा संधी दिली पाहिजे, असे आवाहन महायुतीचे पदाधिकारी करत आहे.
विरोधकांनी त्यांना टपरीबाज, छपरिबाज, गुंडशाही आणि फेकूचंद अशा उपमा देऊन आरोप केले असले तरी, संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेल्या प्रयत्नामुळेच विरोधकांची खालच्या पातळीवरती धारही बोथट ठरत आहे. संजूभाऊंच्या कार्यक्षमतेमुळेच मतदार संघातील हजारो लोकांना मूलभूत सुविधा व विकासाची फळे मिळाली आहेत.
धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची जनमानसातील लोकप्रियता पाहून तसेच त्यांच्या कार्याची आपण बरोबरी करू शकत नाही, हे समजल्यावर बुलढाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात त्यांच्यावर जोरदार टीका केली जात असलीतरी, संजूभाऊंचे कार्य हेच त्याचे उत्तर असल्याचे बोलल्या जात आहे. काहीजण मुद्दामहून संजूभाऊंना उचकावण्याचा प्रयत्न करत आहे, पण हा कावा ते आधीच ओळखून आहेत!