एकनाथ शिंदेंच्या खास शिलेदाराचा भाजप गेम करणार!
चर्चेला उधाण
चर्चेला उधाण
मानोरा (MLA Sanjay Rathod) : नव्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून भाजप २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास शिलेदाराचा भाजप गेम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २१ दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत होते.
अखेर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यानंतर बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार आहे. रविवारी, १५ डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून भाजप २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास शिलेदाराचा भाजप गेम करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महायुती आघाडीत भाजपचे आमदार (MLA Sanjay Rathod) सर्वाधिक असल्याने त्यांच्या आमदाराला अधिक खाती मिळणार आहेत. भाजपने मंत्रिपदासाठी आपला फॉर्म्युला ठरवला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून कमी करून त्यांच्यावर पक्ष – संघटनेची जबाबदारी टाकण्यात येणार आहे. प्रादेशिक, जातीय समीकरण जुळवताना पक्ष वाढीसाठी थेट फायदा करणाऱ्या आमदारांनाच मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची माहिती सूत्राकडून कळत आहेत. भाजपाकडून आगामी काही महिन्यातच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीची तयारी सुरू झाली आहे. भाजपने आता विविध समाज घटकात आपले नेत्यांची निवड करण्यास सुरुवात केली आहे.
शिंदेंच्या खास नेत्याला भाजपचा (MLA Sanjay Rathod) राज्यात भाजपचा ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात त्यांच्या सभांसाठी चांगलीच मागणी होती. ओबीसी आणि इतर समाज घटकाला आपल्याकडे बांधून ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झाला आहे. बंजारा समाजाची पार्श्वभूमी असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना देखील भाजप पर्याय उभा करणार आहे.
काही मतदारसंघात विशेषत: मराठवाडा, विदर्भात बंजारा समाजाची चांगली ताकद आहे. ही ताकद आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांना पर्याय म्हणून डॉ. तुषार राठोड यांना ताकद देण्याचा विचार सुरू केला असल्याची चर्चा ऐकावयास येत आहे. डॉ. तुषार राठोड हे मुखेडचे आमदार आहेत. त्यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा घेत बंजारा समाजावर त्यांची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार असल्याचे समजते. डॉ. तुषार राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. त्यातून त्यांना अधिक बळ देता येईल.
कोण आहेत डॉ. तुषार राठोड?
त्यांनी वर्ष २००६ ते २०१० या कालावधीत वैद्यकीय अधिकारी म्हणून ग्रामीण भागात काम केले. त्यानंतर २०१३ ते २०१४ मुखेड येथे रेडिओ लागिस्ट म्हणून काम केले. त्यांचे वडील गोविंद राठोड पूर्वीपासून राजकरणात सक्रिय होते. दिवंगत नेते, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्यासोबत होते. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. गोविंद राठोड यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जाऊ लागले. २०१४ साली भाजपाकडून गोविंद राठोड आमदार झाले. त्याच वर्षी त्यांचे निधन झाले.
पोट निवडणुकीत डॉ. तुषार राठोड हे बहुमताने मतांनी विजयी झाले. त्यानंतर २०१९, २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला. भाजपातही त्यांनी विविध पदांवर काम केले. सध्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांचा मंत्रिमंडळात पत्ता कट भाजपाचा बंजारा समाजाचा आमदार डॉ. तुषार राठोड यांना मंत्रिमंडळात समावेश करण्यासाठी गेम खेळत असल्याची चर्चा बंजारा समाजातील राजकीय तज्ञ करीत आहे.