आखाडा बाळापूर/हिंगोली (MLA Santosh Bangar) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उमेदवार पहिली यादी रात्री उशिरा जाहीर केली या याद्दीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून विद्दमान आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांची उमेदवारी जाहीर केली आहे. आ.संतोष बांगर २४ ऑक्टोंबर गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कळमनुरी मतदारसंघात बुधवार सकाळपर्यंत दोन प्रमुख पक्षाच्या उमेदवारी घोषित झालेल्या आहेत. मतदारसंघात महाविकास अघाडीकडून कोणाला उमेदवारी भेटते याकडे लक्ष लागले आहे. उमेदवारी करता शिवसेना इच्छुकात मोठी स्पर्धा सुरू आहे यातून कोण बाजी मारतो यावर निवडणूक लढतीच चित्र अवलंबून आसणार आहे. शिंदे शिवसेनेकडून आ .संतोष बांगर (MLA Santosh Bangar) बरोबर वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. दिलीप मस्के उमेदवारी जाहीर झालेली आहे. मतदारसंघात निवडणूक हालचाली गतीमान झालेल्या आसुन प्रमुख पक्षाबरोबर इतर काही पक्ष उमेदवार तसेच अपक्ष मैदानात उतरण्यासाठी तयारी करत आहेत.