कळमनुरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
कळमनुरी/हिंगोली (MLA Santosh Bangar) : विधानसभा मतदारसंघात महायुतीतर्फे उभे असलेले आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचे नावाने बनावट फेसबुक तयार करून त्याद्वारे आदर्श आचारसहिता लागण्यापूर्वीचे पोस्ट व्हायरल केल्याने कळमनुरी पोलीस ठाण्यात बुधवारी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या नावाने कोणीतरी अज्ञात आरोपीने बनावट फेसबुक अकाउंट तयार करून आमदार बांगर यांनी विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसहिता लागण्यापूर्वी प्रसारित केलेल्या पोस्ट ह्या बनावट फेसबुक अकाउंट वरून आदर्श आचारसंहिता कालावधीत वारंवार पोस्ट करून आमदार संतोष बांगर यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचे दर्शवून आमदार बांगर यांची बदनामी केल्याने त्यांनी हिंगोलीतील सायबर सेल मध्ये लेखी तक्रार दिली होती. त्यावरून कळमनुरी पोलीस ठाण्यात 6 ऑक्टोबरला आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीवर माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भोसले हे करीत आहेत.