आ. संतोष बांगर यांच्या जिल्हाधिकारी हिंगोली व जिल्हा कृषी अधिकारी यांना सूचना
हिंगोली (MLA Santosh Bangar) : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जिल्हाधिकारी हिंगोली व जिल्हा कृषी अधिकारी यांना (heavy rains) अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्याबाबत सूचना केली.
शासनाच्या सूचनेनुसार पर्जन्यमानातील असाधारण कमी /जास्त प्रमाण या अटीनुसार पीकविमा धारकास वरील परिस्थिती उद्भवल्यास जिल्हाधिकारी यांनी अधिसूचना काढून पिकविम्यामध्ये 25 टक्के अग्रीम रक्कम नुकसानग्रस्त पीकविमा धारक शेतकऱ्यांना देण्यात यावी, अशी मागणी आ. संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी यांना केली आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानग्रस्त पिकविमाधारक शेतकऱ्यांना पिक विम्याची 25% अग्रीम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.