हिंगोली(Hingoli):- कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षक सन्मान सोहळा कार्यक्रम राणीसती मंगल कार्यालय हिंगोली येथे दिनांक 8 सप्टेंबर रोजी आयोजित करून जिल्ह्यातील 3000 शिक्षकांचा सपत्नीक सन्मानचिन्ह, शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व साडीचोळी देऊन करण्यात आला.
3000 शिक्षकांचा सत्कार करुन केला सन्मान
या कार्यक्रमासाठी आमदार संतोष बांगर यांचे प्रथम शिक्षक प्रभाकर जोशी, नामदेव कावरखे शिक्षणाधिकारी प्राथमिक संदिप सोनटक्के, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत डिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले ,दत्ता नांदे ,यास सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर पोपलाईत ,राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर ,अखिल महाराष्ट्र महिला शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष रेणुका देशपांडे,जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता पडोळे , महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे विभागीय अध्यक्ष पंडीत नागरगोजे , जिल्हाध्यक्ष श्रीराम महाजन ,अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे व्हि.डी देशमुख , मागासवर्गीय कास्टट्राईब संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश खंदारे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किरण राठोड , पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन बोरकर यासह आदि उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन सुरूवात केली .
पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन सुरूवात केली
जिल्ह्यातील शिक्षकांचा सन्मान सोहळा करण्यापुर्वी आमदार संतोष बांगर यांनी त्यांचे प्रथम शिक्षक (गुरुजी) प्रभाकर जोशी, नामदेव कावरखे यांचे पादयपुजन करून त्यांचे दर्शन घेऊन व त्यांचा सपत्नीक सत्कार करून जिल्ह्यातील उपस्थित सर्व महिला शिक्षिका व शिक्षक अशा ३००० शिक्षकांचा स्वतः सन्मानमानपत्र शाल श्रीफळ पुष्पहार व साडीचोळी देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष राठोड यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुनिल कांबळे,राजकुमार मोरगे ,प्रमोद दिपके ,यांनी केले आभार प्रदर्शन सुहास घुगे यांनी मानले , कार्यक्रम प्रसंगी शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के,प्रशांत डिग्रसकर, गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांनी आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला हा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रथम कार्यक्रम आहे. जो आमदार यांनी एवढा भव्यदिव्य कार्यक्रम घेऊन शिक्षकांच्या पाठिवर कौतुकाची थाप दिली आहे या मधुन शिक्षकांना काम करण्यासाठी उत्साह निर्माण झाला असुन एक प्रेरणा मिळाली आहे. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सतत तळमळ करणारे एक आमदार संतोष बांगर यांनी शिक्षकांचे जे प्रश्न शिक्षण विभागाकडे मांडले आहेत. येत्या ३० सप्टेंबर पर्यंत सोडवून शिक्षकांना सन्मानाची भेट देणार आहे.
विषय शिक्षकांच्या दर्जोन्नतीचा प्रश्न आमदार बांगर यांच्यामुळेच सुटला
यापुर्वी विषय शिक्षकांच्या दर्जोन्नतीचा प्रश्न आमदार बांगर यांच्यामुळेच सुटला आहे. आमदार संतोष बांगर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना शिक्षक हा माझ्या हृदयातील दैवत आहे शिक्षकांचा सन्मान करावा हा एक माझा हेतु होता त्या उद्देशातुन शिक्षकांचा सन्मान सोहळा आयोजित करून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी काम करणारे वाडी तांडावर पुरस्कारापासुन वंचित असणा-या सर्व शिक्षकांचा सन्मान करण्याचे भाग्य मला मिळाले यापेक्षा मला कोणताही आनंद नाही ,सर्वच लोकप्रतिनिधींनी शिक्षकांचा सन्मान करावा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी मी सतत पाठपुरावा करतो व ते सोडविण्यांचे प्रयत्न करतो जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असलेलै सर्व प्रश्न ३० सप्टेंबर पर्यंत सुटतील व राज्य स्तरावरील सर्व प्रश्न तसेच राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे जादा वेतनवाढीचा प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून दिवाळीपूर्वी सोडविण्याचा प्रयत्न करणार असे शिक्षकांना आश्वासन दिले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालाजी गोरे किरण राठोड, जितेंद्र गुठ्ठे, प्रभाकर घुगे, संतोष बांगर, सुभाष जिरवणकर, शेषराव बांगर, इर्शाद पठाण, माधव वायचाळ, रमेश गंगावणे, शाम स्वामी मारोती घुगे, नागोराव गडदे , सारंग गिते , रेखा सुंगधे, रविंद्र देशपांडे, सोपान नागरे सोपान पोले, शाम माने, सचिन गायकवाड,सारंग गिते ,गजानन गिते, शिवशरण रटकलकर, संतोष पाटील, रवि गुट्टे, अनिल आहेर, ब्रम्हानंद गिरी, प्रल्हाद सांगळे, संतोष दराडे,उमेश कुटे ,सोपान पोले ,कैलास सुर्यवंशी,संजय आघाव ,सुधाकर घुगे ,रवि गुठ्ठे , विकास फटांगळे , बिभिषण मिरासे ,विजय जिरवणकर , किशन घोलप ,नेताजी सुभेदार परसराम हेंबाडे ,विजय राठोड ,रमेश राठोड यासह आदिनी परिश्रम घेतले.