माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा सनसनाटी आरोप
लातूर (MLA Shivajirao Patil) : देशमुख परिवाराला पक्षाशी इमानदारीची सवय नाही, अशी टीका करीत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विरोधात त्यांनी कायम काम केले. औशातून बसवराज पाटील यांना पराभूत करण्यासाठी त्यांनी काम केले, असा आरोप माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर (MLA Shivajirao Patil) यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. यावेळी अर्चनाताई पाटील चाकूरकर (Archana Patil) उपस्थित होत्या.
कव्हेकर (MLA Shivajirao Patil) म्हणाले, अमित देशमुख हे लोकप्रतिनिधी नाहीत तर ते कंपनी चालक आहेत. १९८० ते २०२४ पर्यंत अनेक वर्ष मुख्यमंत्रीपद व इतरही मंत्रिपदे त्यांच्या घरात होती; पण त्यांना जनतेची अपेक्षापूर्ती करता आली नाही. पाण्याचा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. यावेळी अजित पाटील कव्हेकर म्हणाले, विकासाच्या बाबतीत लातूर मागे पडले आहे. लातूरचा विकास आपणास करायचा आहे. मतदारांना विविध प्रलोभन आणि दहशत निर्माण करून भीती घालण्याचे काम सुरू आहे, असा आरोप करीत मतदार व कार्यकर्त्यांनी कसलीही भीती बाळगू नये, असा विश्वास अर्चनाताई पाटील (Archana Patil) यांनी व्यक्त केला.
कव्हेकरांची भूमिका चर्चेत…
यावेळी कव्हेकर (MLA Shivajirao Patil) म्हणाले की, ‘डॉ. चाकूरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मी स्वतः व अजित पाटील यांनी खुल्या मनाने त्याचे स्वागत केले. पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमची समाधानकारक चर्चा झाली. पक्ष नेतृत्वाशी संवाद साधत कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्या कानावर घालाव्या एवढीच आमची इच्छा होती.’ दरम्यान याच कव्हेकरांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ‘भाजपाने लातूर शहर व लातूर ग्रामीणमध्ये चुकीचे उमेदवार दिले’, अशी टीका केली होती.