देशोन्नती वूत्तसंकलन
चिखली (MLA Shweta Mahale) : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale) केवळ बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आपल्या लढवय्या स्वभावामुळे परिचित झाल्या आहेत. लोकांच्या प्रश्नांसाठी त्या आक्रमक होऊन सरकारशी लढतात, अडचणींत सामान्यांच्या मदतीला धावून जातात… मतदारसंघाला कुटुंब मानणाऱ्या श्वेताताईंना नागरिकही घरातील सदस्यच मानतात. कोरोनाच्या संकटात जिवाची पर्वा न करता ताई मतदारसंघात उपाययोजनांत व्यस्त असल्याचे तेव्हा अवघ्या बुलडाणावासियांनी पाहिले. शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात श्वेताताई नेहमीप्रमाणे या शेतकऱ्यांच्या मदतीला धावल्या… वीज प्रश्नी महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना धारेवर धरताना त्यांचा आक्रमकपणा पाहून घामाने डबडबलेले अधिकाऱ्यांचे चेहरेही शेतकऱ्यांनी पाहिले.
राजकीय विरोधकांना नामोहरम करण्याची प्रचंड क्षमता, प्रदीर्घ अभ्यास आणि प्रशासनाला सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मजबूर करणाऱ्या (MLA Shweta Mahale) श्वेताताई. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणणाऱ्या श्वेताताई सामान्यांच्या गळ्यातील ताईत बनल्या आहेत. एका महिला आमदारात हा उत्साह, उमेद, वेळप्रसंगीचा आक्रमकपणा, सामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याची कर्तव्य भावना येते कुठून आणि कशी… याबाबत साहाजिकच अवघ्या महाराष्ट्राला कायम कुतूहल राहिलेलं आहे… देशातील सर्वोत्कृष्ठ आमदार म्हणूनही ताईंचा गौरव सिक्स सिग्मा एक्सलन्स अवार्डने त्यांना गौरविण्यात आलेले आहे. शिवाय दोन महिन्यांआधी उत्कृष्ट संसद पटू म्हणूनही श्वेताताईंचा महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान झाला आहे..५ वर्षांत कमावलेले प्रेम आणि गोतावळा घेऊन आमदार श्वेताताई पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत..या पार्श्वभूमीवर आमदार श्वेताताईंच्या प्रवासाबद्दल हे थोडेसे.
अडचण कोणतीही असो नागरिक श्वेताताईंना (MLA Shweta Mahale) फोन लावायला कचरत नाहीत. कौटुंबिक विषय असो की कुणाचा दवाखाना, शेतीविषयक अडचणी, सरकारी कामकाज श्वेताताईंना बिनदिक्कत सांगितल्या जातात आणि विशेष म्हणजे ताईसुद्धा तातडीने त्या समस्येची दखल घेतात आणि मार्गी लावण्यासाठी सरसावतात. पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्याला फोन करायला घाबरणारी माणसं ताईंना हक्कानं फोन करून अडचणी सांगतात. कोरोनामुळे अवघ्या जगातील व्यवहार थांबले होते. अनेक नेते, लोकप्रतिनिधी घरात बसून होते. तेव्हा श्वेताताई मात्र सकाळपासून रात्रीपर्यंत मतदार संघ पिंजून काढत होत्या. नागरिकांना धीर देत होत्या. गावांत उपाययोजनांचा आढावा घेत होत्या. अतिवृष्टीमुळे बुलडाणा, चिखली तालुक्यात सातत्याने मोठे नुकसान झाले. काट्याकुट्याचा, चिखलाचा रस्ता तुडवत श्वेताताई (MLA Shweta Mahale) या काळातही शेतकऱ्यांच्या बांधावर भर पावसात हजर असल्याचे शेतकऱ्यांनी पाहिले.
महिला लोकप्रतिनिधी नावालाच नको…
पक्ष, कार्यकर्ते व परिवाराचा पूर्ण पाठिंबा व आत्मविश्वासामुळे आपल्याला महिला लोकप्रतिनिधी म्हणून कोणत्याही अडचणी आजपर्यंत आल्या नाहीत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आजही महिला लोकप्रतिनिधी केवळ नावाला व बैठकांना उपस्थिती मात्र पतींची, हे चित्र ताईंनी बदललं…
श्वेताताई ते आमदार श्वेताताई…नरेंद्र मोदींच्या कार्याने प्रभावित होऊन राजकारणात
मेरा बुद्रूक येथील श्वेताताईंचा (MLA Shweta Mahale) चिखली तालुक्यातील तोरणवाडा येथील विद्याधर महाले यांच्याशी २००३ साली विवाह झाला. विद्याधर महाले हे सुरुवातीला प्रशासकीय सेवेत बुलडाणा येथे सेवा देत होते. नंतरच्या काळात भाऊसाहेब फुंडकर हे विरोधी पक्षनेते झाल्यावर भाऊसाहेबांचे पीएस म्हणून विद्याधर महाले यांची मुंबई येथे नियुक्ती झाली होती. देशात सत्तापरिवर्तनाचे वारे वाहत होते. गुजरात राज्यात केलेल्या विकासामुळे विकास पुरुष म्हणून नरेंद्र मोदींची प्रतिमा संपूर्ण देशात तयार झाली.
२२ डिसेंबर २०१३ या दिवशी गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री आणि भाजपचे प्रचारप्रमुख असलेले नरेंद्र मोदी यांची मुंबईत महागर्जना रॅली होती. मोदींच्या कार्याने प्रभावित झालेल्या ताई त्या सभेला सामान्य नागरिक म्हणून लोकांमध्ये उपस्थित होत्या. हर हर मोदी, घर घर मोदी ही घोषणा देशभर गाजत असताना मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी काम करण्याचा निश्चय त्याच दिवशी श्वेताताईंनी केला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारात व २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवार सुरेशअप्पा खबुतरे यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
ताईंनी पहिली निवडणूक..
भाऊसाहेब फुंडकर यांनी आदेश दिल्याने २०१७ ची जिल्हा परिषद निवडणूक उंद्री सर्कलमध्ये लढवण्याचा श्वेताताईंनी निर्णय घेतला. काँग्रेसकडून अरविंदबापू देशमुख यांच्या सारखे तगडे उमेदवार होते. परंतु योग्य नियोजन आणि लोकसंपर्क करून पहिली निवडणूक तब्बल ३२०० पेक्षा अधिक मतांनी ताईंनी जिंकली. जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात उंद्री सर्कलमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पांदण रस्त्याचा प्रश्न, जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले व त्या प्रयत्नांना यशही मिळाले.
आधी राष्ट्र, नंतर पक्ष, त्यानंतर व्यक्त
राजकारणात राष्ट्रहित सर्वोतोपरी ही भाजपची शिकवण आहे. राष्ट्रहितासमोर पक्ष आणि व्यक्ती नगण्य आहेत. त्यामुळे पहिले राष्ट्र नंतर पक्ष व त्यानंतर व्यक्ती हेच आपल्या सामाजिक व राजकीय जीवनाचे सूत्र असल्याचे ताईं सांगतात…
मोठ्या मताधिक्क्याने विजयी…
भाजपने विकासकामांची दखल घेऊन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत चिखली मतदारसंघातून श्वेताताईंना उमेदवारी दिली. काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांची निवडणुकीच्या अनुषंगाने केलेली व्यूहरचना श्वेताताईंसमोर आव्हान बनून होती. मात्र लोकांत काम करण्याचा अनुभव आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेल्या विकासामुळे प्रभावित मतदारांनी श्वेताताईंना पहिली पसंती दिली. या निवडणुकीत श्वेताताई ६८१० मतांच्या फरकाने जिंकून आल्या. त्यांना ९३५१५ मते पडली. प्रतिस्पर्धी राहुल बोंद्रे यांना ८६७०५ मते मिळाली.
ही आहे राजकीय महत्त्वाकांक्षा
मी जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारणात आले आहे. समाजाची सेवा करत असताना पक्ष देईल ती जबाबदारी सांभाळण्यासाठी मी कायम तयार आहे.. पथ का अंतिम लक्ष नहीं है सिंहासन चढते जाना, सब समाज को लिये साथ में आगे है बढते जाना” ही भाजपची आपल्याला शिकवण आहे असे श्वेताताई नेहमी सांगतात…
घर आणि राजकारण यांना कसा वेळ देतात?
राजकीय जीवनात असताना अनेकदा घराकडे दुर्लक्ष होते. परंतु सासू, सासरे, आई- वडील, पती, भाऊ यांचा आपल्याला भरपूर पाठिंबा असल्यामुळे मी खूप नशीबवान असल्याचे ताई सांगतात . शिवाय संपूर्ण चिखली विधानसभा मतदारसंघ आपला परिवार असल्याचेही त्या सांगतात…
राजकारणातील मार्गदर्शक
स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या मार्गदर्शनाने ताईंच्या राजकीय जीवनाची सुरुवात झाली. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चैनसुख संचेती, संजय कुटे तसेच चिखलीतून सतिष गुप्त, रामकृष्णदादा शेटे, स्व.भाऊसाहेब लाहोटी यांचे वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन लाभले. लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अधिकाऱ्यांचा नेहमी सहकार्याचाच अनुभव त्यांना आला. आमदारापेक्षा अधिकारी आपल्याला स्वतःच्या परिवारातील सदस्य समजतात. त्यामुळे काम करताना उत्साह टिकून राहिला असे गत ५ वर्षांच्या अनुभवाबद्दल श्वेताताईंनी सांगितले..
ताई राजकारणात आल्या नसत्या तर…
२०१३ पर्यंत सामान्य गृहिणी म्हणून ताई (MLA Shweta Mahale) जीवन जगत होत्या. डी. फार्मपर्यंत शिक्षण झाल्याने मुंबईत खारघर येथे एक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याची पूर्ण तयारी झाली होती. त्यासाठी डॉक्टरांची अपॉइन्मेंट, इतर परवानग्या ही सर्व प्रकिया पूर्ण झाली होती. परंतु २०१३ च्या महागर्जना रॅलीनंतर तो विषय मागे पडला.
मातृशक्तीला भाजपमध्ये मानाचे स्थान
भाजप हा पक्ष संस्कृती व मूल्य जपणारा पक्ष असल्यामुळे मातृशक्तीला भाजपमध्ये सन्मानाचे स्थान आहे. आजघडीला संसदेत सर्वाधिक महिला खासदार, विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही सर्वाधिक महिला नगराध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्या या भाजपच्याच असल्याचे (MLA Shweta Mahale) श्वेताताई सांगतात…
लोकांच्या चेहऱ्यावरील समाधान बघून मिळते ऊर्जा…
लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना केलेल्या कामाचा परिणाम म्हणून लोकांच्या चेहऱ्यावर दिसत असलेले समाधान बघून काम करण्याची एनर्जी मिळते. ५० वर्षांच्या एका काकूला गुडघ्याचा त्रास होता. पायाने चालता येत नव्हते. ऑपरेशनचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. तेव्हा ६ ते ७ लाख रुपये खर्च करून त्यांचे उपचार केले. आज त्या काकू स्वतःच्या पायावर चालताना बघून समाधान वाटते असे ताई सांगतात..भानखेड येथील महादू वाघ यांनी कोळी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या केली. मुलीचे लग्न ठरलेले. घरची परिस्थिती बेताची. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या सभापती असलेल्या ताई व विद्याधर महाले यांनी यांनी महादू वाघ यांच्या मोनिका या मुलीचे कन्यादान केले. लग्नासाठी लागणारा संपूर्ण खर्च उचलून अतिशय धुमधडाक्यात मोनिकाचे कन्यादान करण्यात आले. या लग्नात ताई व त्यांचे पती विद्याधर महाले हे सकाळपासून कन्यादान होईपर्यंत उपस्थित होते. आजही ताई व श्री. महाले मोनिकाकडे स्वतःच्या मुलीप्रमाणे लक्ष ठेऊन असतात.
आमदार झाल्यावर मतदार संघाच्या सर्वांगीण उन्नती कडे लक्ष…
२०१९ मध्ये आमदार झाल्यानंतर श्वेताताईंची (MLA Shweta Mahale) पहिली अडीच वर्षे विरोधात गेली. या काळात रणरागिणी म्हणून श्वेता ताई विरोधकांना जाब विचारतांना दिसल्या. केवळ सवाल उपस्थित करून श्वेताताई थांबल्या नाही तर विरोधात असताना देखील अनेक बाबींचा यशस्वी पाठपुरावा त्यांनी केला. अडीच वर्षांनी सत्तांतर झाल्यानंतर मात्र श्वेताताईंचा विकासरथ वेगाने धावू लागला. मतदारसंघातील गाव अन् गावात ताईंनी विकासगंगा पोहचवली. चिखली शहरातही गेल्या ५० वर्षात झाली नाही तेवढी विकासकामे श्वेताताईंनी केली.आता या कामांची यादी घेऊनच श्वेताताई मतदारांसमोर जात आहेत..त्यामुळे सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ताईंचा विजय निश्चित मानल्या जात आहे…