कोतवाल संघटनेच्या वतीने आ. श्वेताताई महाले यांना निवेदन
देशोन्नती वृत्तसंकलन
चिखली/बुलढाणा (MLA Shweta Mahale) : महसूल विभागातील (Revenue Department) कोतवाल कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदाचा दर्जा मिळावा यासाठी तालुक्यातील नवनियुक्त झालेल्या कोतवाल संघटनेच्या वतीने आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांना २० जुलै रोजी निवेदन सादर केले . निवेदनात नमूद केले आहे की, कोतवाल हे पद महसूल विभागात स्वतंत्र पूर्व काळापासून अस्तित्वात आहे परंतु, अद्याप पर्यंत या पदाला चतुर्थ श्रेणी पदाचा दर्जा न देता अ वर्गीकृत कर्मचारी सेवा घेत असल्याने व सदर पदावरील कर्मचारी नियमित चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याप्रमाणे महसूल विभागातील कामे करत आहेत.
या बाबतीत ३ जुलै रोजी मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांच्या सोबत महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची सकारात्मक चर्चा झाली होती. परंतु स्थानीक आ. श्वेताताईं महाले पाटिल (MLA Shweta Mahale) यांनी शासन दरबारी पाठपुरावा करावा चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा देऊन न्याय द्यावा असे संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी रवींद्र अंभोरे अनुप मस्के, सचिन वानखेडे, , ज्ञानेश्वर आदबाने, मोहन तरमळे, बळीराम शिंदे, रंजना जाधव, अर्चना सोळंकी , मुकेश परिहार, प्रशांत खरात,अजय खरात, सुनील देवकर , विनोद सोनुने , प्रल्हाद थोरात ,vशेख हारून ,प्रभाकर इंगले , शेख शफिक, महेश घाडगे , सचिन केदार ,बंडू महाजन , यासह अनेक (Kotwal employees) कोतवाल संघटनेचे कर्मचारी उपस्थित होते.