आ. श्वेताताई महालेंच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना मिळाला रस्ता
चिखली (MLA Shweta Mahale) : पुर्वी पासुन शेतात जाणाऱ्या शेतरस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होती त्याला पांधी या नावाने संबंधित केल्या जायचे नाव रस्ता असायचे मात्र याचा वापर पाणी पाऊस असला तर बंद होत होत होता. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी दुसरा पर्याय नसाचा शेतकऱ्यांची ही समस्या दुर करण्याचे स्वप्न बाळगून असलेल्या आणि विकासाची दुरदृष्टी असलेल्या आ.श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी शेतकऱ्यांची या त्रासातुन मुक्ती करण्याचा ध्यास घेत हे काम हाती घेतले आणि आज सवणा -हातणी हा शेतरस्ता शेतकऱ्यांना पाणी पाऊस असला तरी शेतात जाण्यासाठी उपयुक्त ठरत असुन शेतरस्ते शेतकऱ्यांसाठी जीवनवाहिनी ठरत आहेत.
शेताची मशागत करण्यापासून ते पेरणी तसेच पिक घरापर्यंत आणण्यासाठी रस्ता हा महत्त्वाचा असतो.परंतु माजी आमदारांनी शेतकऱ्यांच्या ह्या महत्त्वाच्या अडचणी कडे दुर्लक्ष करीत केवळ राजकारण करुन शेतकऱ्यांचे मतदान मिळवण्यासाठी च वापर केला.अनेक शेतकऱ्यांनी केवळ रस्ता नसल्याचे कारण समैर करीत आपली शेती देखील विकल्याचे समोर आले आहे. शेतकऱ्यांसाठी शेतरस्ते हे जीवनरेखा असतात. सवणा ते हातणी हा नवीन रस्ता शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होत असुन आधीच्या कच्च्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जास्त वेळ लागायचा आणि चिखल माती तुडवत शेतात जावे लागायचे त्यामुळे घरुन शेतापर्यंत शेतकरी थकुन जायचे आता मात्र शेतकरी आपल्या दुचाकी किंवा इतर वाहनाची देखील मदत घेऊन शेतापर्यंत जात आहे.
सवणा ते हातणी नवीन पक्का रस्ता वाचवत आहे शेतकऱ्यांचा वेळ
कच्चा रस्ता असल्यामुळे वाहनांना खूप नुकसान होत होते. यामुळे शेतकऱ्यांना वाहतूक खर्चात वाढ होत होती. पक्का रस्ता असल्यामुळे हा खर्च कमी कमी झाला आणि वेळ देखील वाचत आहे.
उत्पादनाची गुणवत्ता वाढ
शेतातून बाजारपेठेत माल पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ कमी झाल्यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकून राहात आहे.अगोदर पाणी पाऊस उघडेपर्यंत शेतात लागलेली मालांची गंजी काढता येत नव्हती परिणामी यामधे पावसाचे पाणी घुसून सोयाबीन सारख्या पिकाची मोठी नुकसान होत होती आणि त्याची गुणवत्ता देखील खालावत होती त्यामुळे या पिकांना बाजारपेठेत भाव कमी मिळत होता आता मात्र वेळेत काढणी होत असल्याने गुणवत्ता वाढुन शेतमालाला योग्य भाव मिळत आहे आणि हाच रस्ता अर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हातभार लावत आहे.
वळतीचा फेरा चुकला
जेव्हा हातणीवरुन सवण्याला जायचा विषय होता तेव्हा वळतीला जावं लागायचं आणि मगं तिथून हातणीला जावं लागायचं आता डायरेक्ट हातणी ला जायचा रस्ता झाल्यामुळे सर्वसामान्याला फायदा होतोय.
आपत्तीच्या वेळी मदत
सोयाबीन सुड्या शेतात असतांना अचानक पाऊस येणे आग लागणे अशा घटना घडलेल्या आहेत रस्ता नसल्याने शेतकरी वेळेत शेतात पोहचु शकला नाही आणि त्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. या रस्त्यामुळे मात्र आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणे सोपे होणार आहे. या (MLA Shweta Mahale) नवीन रस्त्यामुळे शेतकरी आनंदी आहेत हे नक्कीच. हा रस्ता त्यांच्यासाठी एक नवी सुरुवात आहे.
हा शेतरस्ता आमच्या साठी ठरला वरदान
सवणा ते हातणी हा रस्ता अगोदर केवळ एक पांधी होती आणि पाऊस असला तर त्या रस्त्याचा वापर करणे सोईचे नसायचे आता मात्र आ.श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी गावकऱ्यांच्या ह्या समस्या जाणुन घेतल्या आणि आम्हाला रस्ता करुन दिला त्यामुळे आता हाच रस्ता आमच्या साठी वरदान ठरला असल्याची प्रतिक्रिया सवणा येथील वैभव होगे,परसराम खडके सवना, विठ्ठल थोरा ,रामेश्वर थोरात,दिगंबर होगे शेतकऱ्यांनी दिली.