५० लाखाचा शासकीय निधी
चिखली (MLA Shweta Mahale) : आमदार श्वेताताई महालेंच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन तालुक्यातील रानअंत्री येथील परमानंद नारायण सरस्वती संस्थानला त्यांनी “ब” दर्जा मिळवून दिला आहे. यामुळे संस्थानाला ५० लाखाचा शासकीय निधी उपलब्ध झाला असून, संस्थेच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे.
“रानअंत्री संस्थान हे आपल्या भागातील एक पौराणिक आणि तितकेच महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे. परंतु गत अनेक वर्षे याकडे राजकीय पोळी भाजुन घेणाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने याठिकाणी पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. गावकऱ्यांनी वेळोवेळी याबाबत मागणी केली परंतु याकडे दुर्लक्ष केले. परिणामी या संस्थांना चा विकास खुंटला होता.देशविदेशात भला मोठा भक्त वर्ग असलेल्या या संस्थानाकडे पुरेशी देणगी नसल्याने हवा तसा विकास येथे झाला नव्हता गत काही दिवसा पासुन रखडलेल्या कामा संदर्भात रानअंत्री येथील सरपंच तथा समविचारी नागरीकांनी आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांची भेट घेतली आणि देवस्थानला “ब”दर्जा मिळवून देण्याची मागणी केली.
धार्मिक बाबतीत अत्यंत संवेदनशील मन असणाऱ्या आ.श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी देखील या कामासाठी पुढाकार घेऊन वेळोवळी यासाठी प्रयत्न केले. आणि शासन स्तरावर पाठपुरावा केल्या नंतर संस्थांनाला “ब”दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर लगेच याठिकाणी ५० लक्ष रुपये निधी देखील मंजूर झाला काहीच दिवसामध्ये पुन्हा निधी मिळणार असुन या देवस्थानची काया पालट होणार आहे. याबाबत गावकरी समाधान व्यक्त करत असुन आ. श्वेताताई महाले यांच्या मेहनतीचे हे फळ असल्याचे गावकरी बोलत आहे.
या संस्थानला “ब” दर्जा मिळवून देणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब -आ.श्वेताताई महाले
संस्थेच्या विकासासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आणि देवस्थानची प्रगती साधुन भाविक भक्तांना याठिकाणी सर्व सोईसुविधा मिळाव्यात म्हणून या संस्थानाला “ब”दर्जा या पुर्वीच मिळायला हवा होता. परंतु लोकप्रतिनिधी निष्क्रिय असल्याने आजपर्यंत याठिकाणी विकास झाला नव्हता. आता मात्र या संस्थानाला “ब”दर्जा मिळुन देणे ही माझ्या साठी अभिमानाची बाब असल्याच्या प्रतिक्रिया आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale) यांनी व्यक्त केल्या.
या निधीचा उपयोग संस्थेच्या विस्तारासाठी करू.”
-तात्याराव झाल्टे मा.सरपंच, रानअंत्री
रानअंत्री येथील श्रींचे सेवेकरी तात्याराव झाल्टे यांनी आ. श्वेताताईंचे आभार मानत “ब” दर्जा मिळाल्याने संस्थेच्या विकासासाठी नवे दरवाजे उघडले आहेत. आम्ही या निधीचा उपयोग संस्थेच्या विस्तारासाठी करू अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
भक्तांना सुविधा मिळाली… सखाराम माटे
चिखली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ श्वेता ताई महाले पाटील (MLA Shweta Mahale) यांनी देवाच्या संस्थांनला निधी दिल्यामुळे मोठे काम झाले आणि यामुळे या ठिकाणी येणाऱ्या भक्तांना सुविधा मिळणार असल्याने सर्वजण ताईच्या कामावर खुश आहेत.
सहज निधी मिळाल्याने गावकरी समाधान नी……. संतोष झाल्टे
एखाद्या विकास कामासाठी निधी मागायचा म्हणजे मोठी कसरत असते यासाठी अनेक जणांना अनेक दिवस प्रयत्न करावे लागतात तेव्हा कुठे विकासाचा निधी मिळत असतो मग त्यामध्ये इतर परवान्या , शिष्टमंडळ, कागदपत्रे, विनंती अर्ज पाठपुरावा ते सगळे करावे लागते. मात्र श्वेताताई महाले यांनी हा निधी मिळण्यासाठी आम्हाला तसे काहीही करायची गरज पडली नाही. सहजतेने हा निधी मिळाला हे केवळ श्वेताताई (MLA Shweta Mahale) यांच्यामुळे शक्य झाले, अशी प्रतिक्रिया संतोष झाल्टे यांनी व्यक्त केली