गोरेगावातील सभेत पाशा पटेल यांचे आवाहन
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : विधानसभा मतदार संघात आ.तान्हाजी मुटकुळे यांनी शासनस्तरावरून कोट्यावधी रूपयाचा निधी आणून विकास केला. त्यामुळे पुढील भविष्य उज्वलतेसाठी आ.मुटकुळेंना हॅट्रीक करण्याची संधी मतदारांनी द्यावी, असे आवाहन राज्य निती मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शनिवारी गोरेगावात जाहीर सभेतून बोलतांना केले. ९ नोव्हेंबर रोजी गोरेगाव येथे आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांच्या निवडणूक प्रचारार्थ राज्यनिती मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांची सभा घेण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर छत्तीसगडचे माजी आमदार विरेंद्रसिंग साहू, माजी आमदार रामराव वडकुते, आ. तान्हाजीराव मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule), जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे, शिवाजीराव मुटकुळे, जि.प.माजी सदस्य संजय कावरखे, माजी सभापती नथूजी कावरखे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना पाशा पटेल यांनी पुढे सांगितले की, आ.तान्हाजी मुटकुळे यांनी गटतट रहीत विकास साधला आहे. शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करून मतदार संघाच्या विकासासाठी ते नेहमीच झगडत असतात.
त्यामुळे भविष्यातील विकास पूर्ततेसाठी मतदारांनी त्यांना साथ द्यावी तसेच उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याकरीता व हॅट्रीकसाठी संधी द्यावी असे भावनीक आवाहन पाशा पटेल यांनी करून अस्सल शेतकरी भाषेत केंद्र व राज्यशासनाने केलेल्या विकास कामाचा आलेख मांडून शेती क्षेत्रातील प्रत्येक उत्पादनाला विकासाची जोड लावून त्या प्रक्रियेतून उपलब्धतेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे कार्य होत असल्याचे म्हणत सोयाबीन, मक्का, तांदूळ या पिकाची पेंड निर्यात केली जात आहे.
सोयाबीन भावावर त्यांनी सविस्तर विश्लेषण करून शेतकर्यांनी आर्थिक सुबत्तेसाठी बांबू लागवड करावी, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन रामेश्वर देशमुख, प्रास्ताविक डॉ.रविंद्र पाटील यांनी केले. सभेला माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष रविंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य नंदू कांबळे, मुख्तार देशमुख, माजी पं.स.सदस्य रामेश्वर देशमुख, ग्रा.पं.सदस्य जगन्नाथ पाटील, रवणे आदींसह मोठ्या संख्येने मतदारांची उपस्थिती होती.