आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नांना यश
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडुन ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचा व गावांचा विकास करण्याकरीता व या घटकांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही राबविण्यासाठी ५ कोटीचा विकास निधी मंजुर केला असून या निधीतून हिंगोली विधानसभा मतदार संघात बौध्द वस्त्यात सभागृहासाठी निधी दिला असून या निधीतून विकास कामे केली जाणार आहेत. यासाठी विधानसभेचे आ. तान्हाजी मुटकुुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी विशेष प्रयत्न करून निधी खेचुन आणत लवकरच या कामाला सुरूवात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
बौध्द वस्तीमध्ये सामाजिक सभागृहाचे होणार बांधकाम
हिंगोली विधानसभा मतदार संघातील ग्रामीण क्षेत्रामध्ये येत असलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यामध्ये मुलभूत सुविधा पुरविण्याकरीता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सन २०२४-२५ या वर्षासाठी अर्थसंकल्पीय तरतुद ५ कोटी रुपयांचा करण्यात आली असून या कामांना १० टक्के निधी अर्थात ५० लाख रुपये सभागृहाच्या बांधकामासाठी शासनाने २७ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुुंबई यांंनी मंजुरी दिली आहे.
हिंगोली विधानसभा मतदार संघाचे आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी वेळोवेळी शासनाकडे सतत पाठपुरावा करून सभागृहासाठी ५ कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून हिंगोली तालुक्यातील देवठाणा येथे बौध्द वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधकामसाठी ३० लाख रुपये निधी मंजुर केला. या निधीतून ३ लाखातून बांधकाम केले जाणार आहे., लिंबाळा प्र.वा. येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ३० रुपये निधी मंजुर तर ३ लाख रुपयातुन बांधकाम, कनेरगाव नाका येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ३० रुपये निधी मंजुर तर ३ लाख रुपयातुन बांधकाम, कलगाव येथे छत्रपती शाहु महाराज सेवाभावी संस्था पसिरात येथे बौध्द वस्तीतील बौध्द विहार सभागृह बांधकामासाठी ७० रुपये निधी मंजुर तर ७ लाख रुपयातुन बांधकाम, आनंद नगर हिंगोली शहराजवळ असलेल्या बळसोंड आंनद नगर भागातील बौध्द विहाराजवळ सामाजिक सभागृह बांधकाम ३० लाख रुपये निध मंजुर झाला असून यापैकी ३ लाख रुपयांतून सभागृह बांधकाम केले जाणार आहे.
सेनगाव तालुक्यातील म्हाळशी येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ४० रुपये निधी मंजुर तर ४ लाख रुपयातुन बांधकाम,सेनगाव तालुक्यातील सावरखेंडा येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपये निधी मंजुर तर १ लाख रुपयातुन बांधकाम, उर्टी पुर्णा येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपये निधी मंजुर तर १ लाख रुपयातुन बांधकाम, शिवणी बु. येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपये निधी मंजुर तर २ लाख रुपयातुन बांधकाम, पुसेगाव येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी २५ लाख रुपये निधी मंजुर तर २ लाख ५० हजार रुपयातुन बांधकाम, बोंडाळा येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ३० लाख रुपये निधी मंजुर तर ३ लाख रुपयातुन बांधकाम, गोदनखेडा येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपये निधी मंजुर तर २ लाख रुपयातुन बांधकाम, वडहिवरा येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपये निधी मंजुर तर २ लाख रुपयातुन बांधकाम, खंडाळा येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ४५ लाख रुपये निधी मंजुर तर ४ लाख ५० हजार रुपयातुन बांधकाम, सालेगाव येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी १० लाख रुपये निधी मंजुर तर १ लाख रुपयातुन बांधकाम, खुडज येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ३० लाख रुपये निधी मंजुर तर ३ लाख रुपयातुन बांधकाम, सुलदली येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी ३० लाख रुपये निधी मंजुर तर ३ लाख रुपयातुन बांधकाम,खैरखेडा येथे येथे बौध्द वस्तीतील सामाजिक सभागृह बांधकामासाठी २० लाख रुपये निधी मंजुर तर २ लाख रुपयातुन बांधकाम असे १८ गावामध्ये सभागृह बौध्द वस्तीमध्ये होणार असून यासाठी ५ कोटीचा निधी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या प्रयत्नातुन मंजुर झाला आहे. पहिल्या टप्यात ५० लाख रुपयांचा निधी वितरीत झाला असून लवकरच या बौध्द वस्तीतील सभागृह बांधकामाला सुरूवात होणार असल्याचे आ. तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी सांगितले.