जिल्हा शासकीय रूग्णालयात रूग्ण सेवेसह अडी अडचणीवर जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा
हिंगोली (MLA Tanhaji Mutkule) : आ. तान्हाजी मुटकुळे हे तिसर्यांदा निवडून आले आहेत. त्यांनी विकास कामाला लगेचच सुरूवात केली असून १३ डिसेंबर रोजी जलेश्वर तलावाच्या सौदर्यींकरण कामाची पाहणी केल्यानंतर जिल्हा रूग्णालयात रूग्णसेवेसह तेथील अडीअडचणीवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस यांच्याशी चर्चा केली. आ.तान्हाजी मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांची तिसरी इनींग सुरू झाली आहे. या निमित्ताने शुक्रवारी हिंगोलीतील जलेश्वर तलावाच्या सुरू असलेल्या सौदर्यीकरण कामाची पाहणी केली.
सदरील कामे जलद गतीने व्हावेत या संदर्भात त्यांनी संबंधिताला सूचना दिल्या. तसेच अंबिका टॉकीज जवळील पुलाची दुरवस्था झाली असल्याने सदर पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याच्या सूचना कंत्राटदारास दिल्या. त्याचप्रमाणे गुरूवारी आ. मुटकुळे (MLA Tanhaji Mutkule) यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयात अचानक भेट दिली. या ठिकाणी त्यांनी रूग्णसेवेची पाहणी केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, हमीद भाई प्यारेवाले, भाजपाचे सचिव उमेश नागरे, प्रशांत उर्फ गोल्डी सोनी, माजी नगरसेवक संतोष गुठ्ठे, मनोज शर्मा, रजनीश पुरोहित यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.